छत्रपती संभाजीनगर

गणेश मंडळांच्या उत्कृष्ट देखाव्याला लाखांचे बक्षीस

CD
गणेश मंडळांच्या उत्कृष्ट देखाव्याला लाखाचे बक्षीस --- ​बीड, ता. १३ : कल्पतरू प्रतिष्ठानच्या पुढाकारातून शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी भव्य उत्कृष्ट देखावा स्पर्धा राबविली जाणार आहे. देखावा साकारणाऱ्या सर्व सार्वजनिक गणेश मंडळांनी या स्पर्धेत उत्स्फूर्तपणे नाव नोंदणी करावी, असे आवाहन भाजप नेते डॉ. योगेश क्षीरसागर आणि कल्पतरू प्रतिष्ठानच्या सचिव तथा बीड नगर परिषदेच्या गटनेत्या डॉ. सारिका क्षीरसागर यांनी केले आहे. गणेश मंडळांच्या कलात्मकतेला प्रोत्साहन देण्यासाठी कल्पतरू प्रतिष्ठानने आकर्षक बक्षिसे जाहीर केली आहेत. यात ​प्रथम क्रमांक १ लाख रोख व सन्मानचिन्ह, ​द्वितीय क्रमांक ७५ हजार रोख व सन्मानचिन्ह, ​तृतीय क्रमांक ५१ हजार रोख व सन्मानचिन्ह ​याशिवाय इतर उत्कृष्ट देखावे सादर करणाऱ्या मंडळांना उत्तेजनार्थ रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे. बक्षीस वितरणाचा हा सोहळा गणेशोत्सव कालावधीतच आयोजित केला जाईल, असे आयोजकांनी स्पष्ट केले. अधिक माहिती व नोंदणीसाठी श्रीमंत तोंडे अथवा नागेश शेटे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन कल्पतरू प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे. ----------- ​अशी असणार परीक्षण व निवड समिती ​स्पर्धेतील देखाव्यांचे तटस्थ आणि पारदर्शक मूल्यमापन करण्यासाठी विशेष निरीक्षण समितीची स्थापना करण्यात आली आहे. ​समिती सदस्य प्रा. लक्ष्मीकांत बाहेगव्हाणकर, प्रा. संजय पाटील देवळाणकर, प्रा. सारंग वाघमारे, फामजी पारिख आणि विद्याभूषण बेदरकर हे असतील. ​या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या मंडळांनी सांस्कृतिक परंपरा, ऐतिहासिक प्रसंग, धार्मिक-आध्यात्मिक संकल्पना, शैक्षणिक, वैज्ञानिक तसेच स्थानिक ग्रामीण व शहरी जीवनाशी संबंधित सामाजिक संदेश देणारे देखावे साकारणे अपेक्षित आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रज्वल रेवन्नाचा आणखी एक कारनामा; तुरुंगात जप्त केलेल्या मोबाइलमध्ये सापडले १४५ हून अधिक अश्लील व्हिडीओ

IND vs WI: ऋतुराज गायकवाड, रिषभ पंत, जडेजाचे पुनरागमन होणार? वेस्ट इंडिजविरुद्धच्या ODI मालिकेसाठी का होणार संघात बदल

हरतालिकेची पूजा का करतात? एका क्लिकमध्ये वाचा व्रताचे महत्त्व!

'मी जे केलं ते तुम्ही करू नका...' सिंगल मदरहुडबद्दल नीना गुप्तांचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाल्या...

Marathi News Live Updates : गंगा नदीत बुडणाऱ्या १० बांगलादेशी नागरिकांची वाचवण्यात बीएसएफला यश

SCROLL FOR NEXT