छत्रपती संभाजीनगर

मूर्तींच्या विसर्जनासाठी तयारी

CD
फोटो क्रमांक- OSM26B07054 ............................. विसर्जनासाठी जय्यत तयारी विहिरीची स्वच्छता; हातलाई तलावात खड्ड्याचे खोदकाम धाराशिव, ता. २२ (बातमीदार) : गणेशमूर्ती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर शहरात पालिका प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू आहे. गणेश मंडळांची गैरसोय होऊ नये, यासाठी स्वच्छता, रस्ते दुरुस्ती तसेच विसर्जनस्थळांची साफसफाईची कामे युद्धपातळीवर हाती घेण्यात आली आहेत. गणेशमूर्ती विसर्जनासाठी शहरातील समतानगर परिसरातील श्री विसर्जन विहीर आणि शहरापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या हातलाई तलाव परिसरातील जागा, अशी दोन ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. श्री विसर्जन विहिरीच्या स्वच्छतेचे काम पालिकेच्या पथकाने गेल्या पाच दिवसांपासून सुरू केले होते. विहिरीतील साचलेला गाळ व कचरा बाहेर काढण्यात आला असून, आता त्यामध्ये पाणी भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. यंदा अपेक्षित पाऊस न झाल्याने हातलाई तलावातील पाणीसाठ्यात फारशी वाढ झालेली नाही. त्यामुळे लहान तसेच मोठ्या गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी अडचण निर्माण होऊ नये, यासाठी पालिकेने मंगळवारी (ता. २२) तलावातील कोरड्या भागात मोठा व खोल खड्डा खोदण्याचे काम सुरू केले. या ठिकाणीही मूर्ती विसर्जनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. ..................... ((चौकट)) खड्डे बुजविण्याचे काम दरम्यान, शुक्रवारी (ता. २५) विसर्जन असल्याने तयारीसाठी अत्यंत कमी कालावधी शिल्लक आहे. विसर्जन मिरवणुकीदरम्यान मोठ्या गणेशमूर्ती घेऊन जाणाऱ्या वाहनांना अडथळा होऊ नये, यासाठी मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजविण्याचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे. यंदा शहरातील सुमारे ७० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मूर्ती स्थापनेसाठी पालिकेकडून ना-हरकत प्रमाणपत्र घेतले आहे. त्यापैकी ३० हून अधिक मंडळांच्या मूर्तींची उंची सहा फुटांपेक्षा अधिक आहे. विसर्जनादरम्यान सार्वजनिक मंडळांनी पालिकेच्या नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. ........... ((कोट)) गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी दोन ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. श्री विसर्जन विहिरीत पाणी सोडण्यात येणार असून, हातलाई तलाव परिसरातही मोठा खड्डा खोदून विसर्जनाची सोय केली जात आहे. - अभिजित गोरे, उपमुख्याधिकारी, धाराशिव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DPL Fixing Controversy: दिल्ली प्रीमियर लीगमध्ये फिक्सिंगचा संशय? वंश बेदीकडे क्रिकेटपटूचा संपर्क; लगेच दिली अँटी करप्शनला माहिती

Shirur News : महागणपतीच्या चार बहिणींच्या गावांना देवस्थान ट्रस्टमध्ये प्रतिनिधीत्व देण्याची मागणी

E20मुळे गाड्या खराब होत नाहीत, ऑक्टोबरमध्ये 100 टक्के इथेनॉलवर चालणारी कार येणार : केंद्रीय मंत्री गडकरी

Mumbai News: रेल्वे पोलिसांच्या कोठडीत ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू, शौचालयात गेला अन्...; CSMTवर काय घडलं?

जमुईतील अल्पवयीन मुलीवरील अत्याचारावर मंत्री श्रेयसी सिंह यांचं वादग्रस्त वक्तव्य; विरोधकांकडून जोरदार हल्लाबोल

SCROLL FOR NEXT