छत्रपती संभाजीनगर

गणपतीचे वाहन मूषकच का?

CD
वाहन मूषकच का? -- विशाल देह असलेल्या गणरायाचे वाहन एवढासा उंदीर का, असा प्रश्न अनेकांना पडतो. मात्र, गणेशाचे मूषक हे वाहन केवळ पौराणिक कथेशी संबंधित नसून त्यामागे चंचल मनावर विवेकाचे नियंत्रण, इच्छांवर संयम आणि अहंकारावर विजय मिळविण्याचा आध्यात्मिक संदेश दडलेला आहे. पौराणिक कथेनुसार, ‘क्रौंच’ नावाचा गंधर्व शापामुळे मूषक झाला होता. अत्यंत शक्तिशाली झालेला हा मूषक ऋषी-मुनींच्या आश्रमांत उपद्रव माजवत असे. त्याचा त्रास वाढल्यानंतर गणपतीने त्याचा पराभव केला. गणेशाचे सामर्थ्य लक्षात आल्यावर क्रौंचाने क्षमा मागून त्यांची सेवा करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर गणपतीने त्याला आपले वाहन म्हणून स्वीकारले, अशी प्रचलित आख्यायिका आहे. मूषक आकाराने लहान असला तरी अत्यंत चपळ असतो. तो अरुंद जागेतही सहज प्रवेश करू शकतो. त्यामुळे मानवी मनातील चंचल विचार, इच्छा आणि वासनांचे प्रतीक म्हणून मूषकाकडे पाहिले जाते. गणपतीने मूषकावर आरूढ होणे म्हणजे बुद्धी आणि विवेकाच्या साहाय्याने मनातील अनियंत्रित प्रवृत्तींवर नियंत्रण मिळविणे होय. ‘मूषक’ शब्दाचा संबंध ‘मुष्’ या संस्कृत धातूशी असून, त्याचा अर्थ ‘चोरणे’ किंवा ‘हळूहळू नष्ट करणे’ असा सांगितला जातो. लोभ, मोह, चिंता आणि नकारात्मक विचारही आपली मनःशांती हळूहळू हिरावून घेतात. गणेशमूर्तीसमोर मूषकाची पूजा करण्यामागेही हीच प्रतीकात्मक भावना आहे. गणेशोत्सवात अनेक भक्त मूषकाच्या कानात आपल्या मनोकामना सांगतात; कारण गणेशाचे वाहन असल्याने तो आपल्या इच्छा गणपतीपर्यंत पोचवतो, अशी श्रद्धा आहे. म्हणूनच, मूषक हे केवळ गणेशाचे वाहन नसून मनावर बुद्धीचे, इच्छांवर संयमाचे आणि अहंकारावर नम्रतेचे नियंत्रण ठेवण्याची शिकवण देणारे एक प्रतीक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रज्वल रेवन्नाचा आणखी एक कारनामा; तुरुंगात जप्त केलेल्या मोबाइलमध्ये सापडले १४५ हून अधिक अश्लील व्हिडीओ

IND vs WI: ऋतुराज गायकवाड, रिषभ पंत, जडेजाचे पुनरागमन होणार? वेस्ट इंडिजविरुद्धच्या ODI मालिकेसाठी का होणार संघात बदल

हरतालिकेची पूजा का करतात? एका क्लिकमध्ये वाचा व्रताचे महत्त्व!

'मी जे केलं ते तुम्ही करू नका...' सिंगल मदरहुडबद्दल नीना गुप्तांचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाल्या...

Marathi News Live Updates : गंगा नदीत बुडणाऱ्या १० बांगलादेशी नागरिकांची वाचवण्यात बीएसएफला यश

SCROLL FOR NEXT