गणेशोत्सव जागतिक पटलावर नेणार
दस्तऐवजीकरण करण्यास सुरवात, आयुक्त जी. श्रीकांत यांची माहिती
छत्रपती संभाजीनगर, ता. २० ः महाराष्ट्राच्या गणेशोत्सवाची सांस्कृतिक समृद्धी व वैशिष्ट्ये जागतिक स्तरावर पोचविण्यासाठी व्यापक डिजिटल दस्तऐवजीकरण करण्यात येत आहे. नागरिक, गणेश मंडळे व शासकीय यंत्रणांनी यात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी केले.
गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाला असून, युनेस्को वारसा दर्जासह जागतिक मानांकनाच्या दृष्टीने ही मोहीम राबविली जात आहे. पुरातत्व संचालनालयामार्फत गणराय डॉट ओआरजी संकेतस्थळावर घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सवातील पूजा, सजावट, मूर्ती, खाद्यपरंपरा, लोककला, सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रमांचे छायाचित्रे व व्हिडिओ अपलोड करता येणार आहेत. सहभागी नागरिकांना डिजिटल सांस्कृतिक संवर्धक प्रमाणपत्र मिळणार आहे. कायदा-सुव्यवस्था, वाहतूक, महिला-बालसुरक्षा, सामाजिक सलोखा, स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, रक्तदान व व्यसनमुक्ती उपक्रमांचेही दस्तऐवजीकरण करण्यात येणार आहे. पोलिस व गणेश मंडळांनी क्यूआर कोडच्या माध्यमातून नागरिकांना सहभागी करून घ्यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
-----------------
चौकट -
मुख्यमंत्री कार्यालयाच्या सूचनेनुसार विभागातील आठही जिल्हाधिकारी व महानगरपालिका प्रशासनाने नोडल अधिकारी नियुक्त करून आढावा घ्यावा. तसेच माहिती व जनसंपर्क विभागाच्या लोकसंवाद उपक्रमातून शासकीय योजनांचा प्रचार करण्यासाठी सर्व विभागांनी सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्तांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.