छत्रपती संभाजीनगर

गणेशोत्सवात `श्री गणेशा आरोग्या`चा अभियान

CD
गणेशोत्सवात ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियान ----- सहायक धर्मादाय आयुक्त कार्यालयाचा पुढाकार, मंडळात होणार आरोग्य शिबिरे सकाळ वृत्तसेवा लातूर, ता. १० ः सध्या राज्यात सर्वत्र गणेश उत्सवाची धामधूम आहे. ता. १४ सप्टेंबरला गणेशाचे आगमन होणार असून प्रत्येक जण गणेशाचे स्वागत करण्यासाठी उत्सुक आहे. या गणेशोत्सवात श्री गणेशा आरोग्याचा अभियान राबवण्यात येणार आहे. यात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या वतीने गणेश मंडळात सामुदायिक आरोग्य शिबिरे घेण्यात येणार आहेत. यात जिल्ह्यातील जास्ती जास्त गणेश मंडळांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सहायक धर्मादाय आयुक्त एस. जे. निंबाळकर यांनी केले आहे. गणेशोत्सव म्हणजे भक्ती, चैतन्य, अफाट उत्साहाचा सण आहे. यावर्षी या उत्सवाच्या काळात ता. १४ ते २५ सप्टेंबर या कालावधीत श्री गणेश उत्सवानिमित्त ‘श्री गणेशा आरोग्याचा अभियान २०२६’ राबविण्यात येत आहे. अभियानाअंतर्गत नोंदणीकृत गणेश मंडळात सामुदायिक आरोग्य शिबिर राबविण्यात येणार आहेत. अभियान यशस्वीरीत्या राबविण्याकरीता धर्मादाय सहआयुक्त विद्याधर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर जिल्ह्यातील सर्व धर्मादाय रुग्णालयांची बैठक आयोजीत करण्यात आली होती. बैठकीत निंबाळकर, यांनी उपस्थित सर्व धर्मादाय रुग्णालयाचे विश्वस्त व प्रशासक तसेच आरोग्य सेवक यांना मार्गदर्शन केले. सर्व धर्मादाय रुग्णालयांनी नोंदणीकृत गणेश मंडळाच्या ठिकाणी ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियान अंतर्गत आरोग्य शिबिर राबविण्याचे निर्देश दिले. तसेच जिल्ह्यातील सर्व गणेश मंडळांनी या गणेश उत्सवाच्या काळात उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन हे अभियान यशस्वीरीत्या राबवावे, असे आवाहन करण्यात आले. वर्गणी संकलनासाठी परवानगी आवश्यक महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० मधील कलम ४१ (क) नुसार गणेश मंडळांना वर्गणी गोळा करण्याकरीता धर्मादाय कार्यालयाची परवानगी आवश्यक आहे. तरी सर्व गणेश मंडळांनी या कार्यालयाची परवानगी घ्यावी. अन्यथा परवानगी न घेणाऱ्या गणेश मंडळांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असे सहायक धर्मादाय आयुक्त निंबाळकर यांनी स्पष्ट केले. --- ------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jintur Accident : आईसोबत गजानन महाराजांच्या आरतीला गेलेल्या ७ वर्षीय निष्पाप चिमुकल्याचा अज्ञात क्रूझर वाहनाने दिलेल्या धडकेत दुर्दैवी मृत्यू

IND vs AFG : भारत-अफगाणिस्तान पहिल्या सामन्यावर संकट! दिल्ली पोलिसांचे पत्र अन् उडाली खळबळ; नेमकं काय घडलं?

Video: गार्गीला वाचवण्यासाठी गौतमी पाटीलची साद; सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाली, 'तिला मदत करा'

Ganesh Chaturthi 2026: गणपती बाप्पाला मोदकाचाच नैवेद्य का? जाणून घ्या मोदकामागचा खरा अध्यात्मिक अर्थ!

Pakistan Cricket : पाकिस्तानचे दोन सीनियर खेळाडू निघाले 'गद्दार'? सायबर क्राईमने पाठवले समन्स, लॉर्ड्स कसोटीत Fixing ची शंका

SCROLL FOR NEXT