अँकर पान ३
--
डीजे टाळून पारंपरिक वाद्याला प्राधान्य द्या
ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी लातूर पोलिसांचे गणेश मंडळांना आवाहन
---
सकाळ वृत्तसेवा
लातूर, ता. १२ ः गणेशोत्सव हा आनंद, भक्ती, सामाजिक एकोपा आणि शांततेचा उत्सव आहे. त्यामुळे एखाद्या गणेश मंडळातील एखाद्या पदाधिकाऱ्याच्या डीजे लावण्याच्या आग्रहामुळे संपूर्ण गणेश मंडळाला कायदेशीर अडचणीत आणू नका, पारंपरिक वाद्यांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन पोलिस विभागाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व गणेश मंडळांना करण्यात आले आहे.
लातूर जिल्ह्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस विभागाकडून शांतता, सुव्यवस्था आणि ध्वनिप्रदूषणमुक्त वातावरणात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. गणेशोत्सवामध्ये डीजे व कर्णकर्कश ध्वनिक्षेपकांचा वापर टाळून पारंपरिक वाद्यांच्या साथीने उत्सव साजरा करण्यावर पोलिस विभागाचा भर आहे. लेझीम, ढोल-ताशा, झांज पथक यांसारख्या पारंपरिक वाद्यांच्या माध्यमातून उत्सवाचा आनंद घेता येतो आणि त्यातून आपल्या संस्कृतीचेही जतन होते. ध्वनिप्रदूषणाचा परिणाम लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती तसेच गर्भवती महिलांवर होऊ शकतो. त्यामुळे उत्सव साजरा करताना आपला आनंद इतरांसाठी त्रासदायक ठरणार नाही, याची प्रत्येक गणेश मंडळाने काळजी घ्यावी, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे. ‘गणेशोत्सव हा भक्तीचा आणि आनंदाचा उत्सव आहे. तो कोणाच्याही त्रासाचे कारण बनू नये’, या भावनेतून लातूर जिल्ह्यातील सर्व गणेश मंडळांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
---
डीजे वाजवल्यास अध्यक्ष, सचिवांवरही कारवाई
डीजे लावला तर कारवाई केवळ संबंधित व्यक्तीपुरती मर्यादित राहणार नाही. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या गणेश मंडळाचे अध्यक्ष, सचिव तसेच जबाबदार पदाधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होऊ शकते. त्यामुळे एखाद्या पदाधिकाऱ्याच्या वैयक्तिक आग्रहाला बळी पडून संपूर्ण मंडळाचे पदाधिकारी कायदेशीर अडचणीत येणार नाहीत याची दक्षता घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.