छत्रपती संभाजीनगर

वस्त्यांवरील इमर्जन्सी लोडशेडिंगने जनजीवन विस्कळीत; विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य अंधारात,शेतकरी संतप्त

CD
लो-व्होल्टेजमुळे विद्यार्थ्यांची गैरसोय - गणेशवाडी उपकेंद्रांतर्गत लोडशेडिंगमुळे ग्रामस्थ संतप्त कायगाव, ता. ७ (बातमीदार) : गंगापूर तालुक्यातील गणेशवाडी ३३ केव्ही वीज उपकेंद्राअंतर्गत येणाऱ्या शेतवस्त्यांवर २ सप्टेंबरपासून सुरू असलेल्या इमर्जन्सी लोडशेडिंगमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. कमी व्होल्टेज, बंद पडलेले वॉटर फिल्टर, मोबाइल चार्जिंगची अडचण आणि त्यातच बिबट्या-सर्पदंशाच्या भीतीने ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळित झाले असून विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात ढकलले जात आहे. यामुळे महावितरणविरोधात परिसरात संताप व्यक्त होत आहे. सिंगल फेज योजनेचा व्होल्टेज बुधवारपासून (ता. दोन) कमी करण्यात आल्याने वीज असतानाही पंखे आणि दिवे लागत नाहीत. सराव परीक्षा तोंडावर असताना विद्यार्थ्यांना मेणबत्तीच्या मंद प्रकाशात अभ्यास करावा लागत आहे. रविवारी (ता. सहा) रात्री साडेसात ते सोमवारी सकाळी ६ः१८ पर्यंत सलग वीज गायब असल्याने रात्रभर शेतवस्त्या अंधारात होत्या. त्यातच गोदावरी आणि शिवना नदीकाठच्या परिसरात बिबट्याचा वावर असल्याने रात्रीच्या अंधारात शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. ‘शहरात चोवीस तास वीज आणि वस्त्यांवरच अंधार का?" असा संतप्त सवाल शेतकरी विचारत आहेत. सिंगल फेजचा व्होल्टेज वाढवून तो अखंडित करावा आणि रात्रीच्या वेळी सुरू असलेले इमर्जन्सी लोडशेडिंग तत्काळ बंद करावे’, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली आहे. प्रतिक्रिया गोदावरी पट्ट्यातील शेतकऱ्यांवर महावितरणकडून अन्याय होत आहे. डेंगी, मलेरियाची साथ सुरू असताना लो-व्होल्टेजमुळे पंखाही फिरत नाही. शहरात वीज आणि आम्ही मात्र अंधारात, आम्ही माणसे नाही का? लोडशेडिंग सर्वांना समान करा, अन्यथा तीव्र उपोषण छेडू. - भाऊसाहेब शेळके, शेतकरी नेते, भिवधानोरा -- प्रतिक्रिया राज्यात विजेची अचानक मागणी (इमर्जन्सी लोड) वाढल्यास वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशानुसार ग्रामीण भागातील कृषी (एजी) आणि गावठाण (ईजी) फीडरचा वीजपुरवठा तात्पुरता बंद करावा लागतो. नागरिकांनी या परिस्थितीत सहकार्य करावे. - अरविंद काळे, उपकार्यकारी अभियंता, महावितरण, गंगापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant: देशाच्या सरन्यायाधीशांनी घेतली बीडच्या रमाबाईंची दखल; लेकीच्या शिक्षणासाठी धावणाऱ्या महिलेला भरीव मदत

Duleep Trophy Final: ३० चौकार अन् ७ षटकार... ईशान किशन बरसला, पण त्रिशतक हुकलं; संघाच्या तब्बल ७०० धावा पार

आई म्हणाली ‘चॉकलेट बंद कर’; स्क्वॉशपटू अनाहतने थेट न्यूट्रिशनिस्टलाच फोन केला! नेमकं काय घडलं? Viral Video

नालासोपारा शहराचे नाव बदलणार, प्राचीन ऐतिहासिक वारशाला नवी ओळख मिळणार; महापालिकेचे महत्त्वाचे पाऊल

Marathi News Live Updates: कोथरूड पोलीस स्टेशनच्या बाहेर कोथरूडकर एकवटले

SCROLL FOR NEXT