Chhatrapati Sambhajinagar Crime Sakal
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar Crime : उद्यानात नशा करण्यास विरोध केल्याने टोळक्याने घरात घुसून वॉचमनला भोसकले

शास्त्रीनगरातील मनपा उद्यानात नशा करण्यास मज्जाव केल्यामुळे नशेखोरांच्या टोळक्याने सुरक्षारक्षकावर घरात घुसून चाकूहल्ला केला.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : शास्त्रीनगरातील मनपा उद्यानात नशा करण्यास मज्जाव केल्यामुळे नशेखोरांच्या टोळक्याने सुरक्षारक्षकावर घरात घुसून चाकूहल्ला केला. त्यांच्यावर छाती आणि पोटात चार गंभीर वार करण्यात आले. सुरक्षारक्षकाची प्रकृती चिंताजनक असून, त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. ही घटना रविवारी (ता. ७) संध्याकाळी साडेसात वाजता घडली.

उत्तम रूपा चव्हाण (४५, रा. शास्त्रीनगर उद्यान) असे जखमी सुरक्षारक्षकाचे नाव आहे. ते उद्यानातच एका खोलीत कुटुंबासह राहतात. शास्त्रीनगरात मनपाचे उद्यान आहे. तेथे शास्त्रीनगर को ऑप हाउसिंग सोसायटीतील अनेक कुटुंबे फिरण्यासाठी उद्यानात येतात.

दरम्यान, अंधार झाल्यावर काही टवाळखोर, नशेबाज तरुणांचे टोळकेही येथे नेहमी येत असते. रविवारी चार ते पाच नशाखोर उद्यानात नशा करीत बसले होते. सुरक्षारक्षक चव्हाण यांनी त्यांना हटकले. उद्यानात नशा करण्यास मज्जाव करून त्यांना तेथून हाकलून दिले.

काही वेळाने त्यातील दोन नशाखोर चाकूसह परत उद्यानाकडे आले. तेव्हा चव्हाण हे त्यांच्या खोलीत होते. नशाखोरांनी चव्हाण यांच्या पत्नीसमोर घरात घुसून त्यांच्यावर चाकूहल्ला केला. दोन्ही आरोपींनी मिळून चार वार केले.

एक वार छातीजवळ लागला आहे. त्यामुळे चव्हाण हे रक्तबंबाळ होऊन जागीच कोसळले. त्यानंतर दोन्ही आरोपी उद्यानाच्या मागील बाजूने भिंतीवरून उडी मारून पसार झाले. आरडाओरड झाल्यावर स्थानिकांनी जखमी उत्तम चव्हाण यांना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथून त्यांना दुसऱ्या ठिकाणी हलविण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT