गंगाखेड रेल्वे स्टेशन-बसस्थानक
रस्त्यावरील अतिक्रमणे हटवा
-----------------
ग्राहक पंचायतीची मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी
गंगाखेड, ता.६ (बातमीदार) : शहरातील रेल्वे स्टेशन ते बसस्थानकादरम्यानच्या मुख्य रस्त्यावर दोन्ही बाजूंनी अतिक्रमणे फोफावल्याने पादचारी आणि वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे ही अतिक्रमणे तातडीने हटवून रस्ता मोकळा करावा, अशी मागणी अ. भा. ग्राहक पंचायतीतर्फे न.प. मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
रेल्वे स्टेशन ते बसस्थानक हा शहरातील अत्यंत महत्त्वाचा वर्दळीचा रस्ता आहे. मात्र, या रस्त्याच्या एका बाजूस अतिक्रमणे वाढली आहेत. त्यामुळे पादचारी महिला, शाळकरी विद्यार्थी, लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांना चालण्यासाठी जागाच उरलेली नाही. रेल्वे स्टेशनवरून बसस्थानकाकडे जाणाऱ्या प्रवाशांनाही अडथळ्यांचा सामना करावा लागत असून, या मार्गावर वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी अतिक्रमण झालेल्या ठिकाणी पुरेसा प्रकाश नसल्याने अपघातांचा धोका वाढला आहे. महिलांत भीतीचे वातावरण आहे. बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांनाही या रस्त्यावरील गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. नगर परिषदेने रेल्वे स्टेशन ते बसस्थानकादरम्यानच्या रस्त्याची मोजणी करून तीन दिवसांत अतिक्रमणे निष्कासित करावीत. रस्त्यावर पुरेशा प्रमाणात पथदिवे लावावेत. रात्रीच्या वेळी पोलिस गस्त वाढवावी आणि भविष्यात पुन्हा अतिक्रमण होणार नाही. यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात. या मागण्यांवर सात दिवसांत कारवाई न झाल्यास जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेतर्फे न.प. समोर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य सोपानराव टोले, प्रतिभा वाघमारे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.