छत्रपती संभाजीनगर

अल्पवयीन मुलीवरील लैंगिक

CD
अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपीला २० वर्षे कारावास ----- गंगाखेड, ता. २२ (बातमीदार) : अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाने २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच ५८ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला असून, दंडाच्या रकमेतून ५० हजार रुपये पीडितेस नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेश सोमवारी (ता. २१) दिले. ११ सप्टेंबर २०२५ रोजी सोनपेठ पोलिस ठाण्यात साठ वर्षीय महिलेने दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले, नात दूध आणण्यासाठी घराबाहेर गेली होती. मात्र, ती परत न आल्याने तिचा शोध घेण्यात आला. त्यावेळी मुलगी आरोपीच्या घरात आढळून आली. याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तत्कालीन पोलिस निरीक्षक अशोक गिते, पोलिस उपनिरीक्षक आशिष कांबळे, पोलिस उपनिरीक्षक अजय किरकन यांनी तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकार पक्षातर्फे आठ साक्षीदारांची साक्ष तपासण्यात आली. न्यायालयाने आरोपी दीपक बालू भोसले (वय २५) याला दोषी ठरवत २० वर्षे सश्रम शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे अभियोग्यता ज्ञानोबा दराडे, सहायक सरकारी अभियोक्ता एस.बी. पौळ, एस. डी. वाकोडकर यांनी काम पाहिले. सोनपेठ पोलिस ठाण्याचे कोर्ट पैरवीकार एम. डी. कुंडगीर, पिंपळदरी पोलिस ठाण्याचे कोर्ट पैरवीकार जे. एच. पठाण, एस. एस. जिंकलवाड, श्रीमती एल. टी. मुंढे यांचे सहकार्य मिळाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026 Medal Table: भारतीय महिलांच्या 'Gold' ने पदकतालिकेत उलथापालथ, १२ व्या स्थानावर असलेलो आपण थेट पोहोचलो...

Supreme Court: एससी-एसटी कायद्यातील तरतुदींना आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली; नेमकं प्रकरण काय?

Numerology: लहान मुलांचा हट्टीपणा अन् जन्म तारीख; 'या' ३ मूलांकांची मुले असतात प्रचंड हट्टी! पाहा काय सांगते अंकशास्त्र...

Vishakha Raut: विशाखा राऊतांना दिलासा, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; प्रिया सरवणकरांच्या नियुक्तीला ब्रेक

IND vs JPN, Video: पहिलाच बॉल अन् अभिषेक शर्माची जपानच्या १७ वर्षांच्या पोरानं घेतली विकेट; नकोसे विक्रमही झाले नावावर

SCROLL FOR NEXT