तरुणावर जीवघेणा हल्ला;
सहा संशयित आरोपींना अटक
गंगापूर, ता. २९ (बातमीदार) : सकाळी झालेल्या क्षुल्लक वादाचा राग मनात धरून एकावर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना शहरातील राजीव गांधी चौकात बुधवारी (ता. २८) रात्री घडली. या हल्ल्यात उमेश ऊर्फ दत्तू संतोष भक्कड (वय ४०, रा. सखारामपंतनगर) हे गंभीर जखमी झाले असून, पोलिसांनी अवघ्या काही तासांत सहा संशयित आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, उमेश भक्कड यांचा बुधवारी (ता. २८) सकाळी राहुल फुलारे व आतिष गायकवाड यांच्याशी वाद झाला होता. रात्री पावणेनऊच्या सुमारास उमेश हे चौकातील एका चहाच्या हॉटेलच्या ओट्यावर बसलेले असताना राहुल फुलारे, आतिष गायकवाड, पवन गायकवाड, करण शिंदे, चेतन गायकवाड व विशाल कापसे (सर्व रा. गंगापूर) तेथे आले. ‘सकाळी शिवीगाळ का केली?’ असा जाब विचारत त्यांनी उमेश यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण सुरू केली. यावेळी राहुल फुलारेने उमेश यांच्या पोटात, पाठीवर आणि डोक्यात चाकूचे सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या उमेश यांना नागरिकांनी तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले; मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. जखमीच्या आई छाया भक्कड यांच्या फिर्यादीवरून गंगापूर ठाण्यात प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा नोंदवून पोलिसांनी सर्व संशयितांना अटक केली. सहायक पोलिस निरीक्षक विनायक पाटील तपास करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.