छत्रपती संभाजीनगर

गौरीच्या नैवेद्यात परंपरेची चव, बदलत्या काळाचा तडका

CD
गौरीच्या नैवेद्याला बदलत्या काळाचा ‘तडका’ --- घराघरांत पदार्थांची विविधता, घरगुती बनवलेला फराळ कमी, बाजारातून आणण्यावर भर - छत्रपती संभाजीनगर, ता. १७ ः सोनपावलांनी घरोघरी गौरीचे आगमन झाले आहे. मराठी संस्कृतीत गौरीच्या नैवेद्याला विशेष महत्त्व आहे. यामुळे घराघरांत सुगंध दरवळला आहे. पण, काळानुसार या नैवेद्यातील पदार्थांमध्येही बदल होत असून, पारंपरिक पदार्थांसोबत आता नव्या पदार्थांची भर पडत आहे. गौरीच्या नैवेद्यासाठी घराघरांत वेगवेगळे पदार्थ तयार केले जात आहे. काही कुटुंबांमध्ये पुरणपोळी, पाटवड्या, अळूवड्या, भाजी, भाकरी, वरण-भात, पंचामृत, कोशिंबीर, खीर, लाडू अशा भरगच्च स्वयंपाकावर भर दिला आहे. काही ठिकाणी सोळा भाज्या, पाच प्रकारच्या कोशिंबिरी किंवा विविध कडधान्यांपासून तयार केलेले पदार्थ नैवेद्यात ठेवण्याची पद्धत आहे. गोड पदार्थांमध्ये पुरणपोळी, श्रीखंड, खीर, मोदक, लाडू यांना विशेष पसंती असते. मराठवाड्यातील अनेक कुटुंबांमध्ये स्थानिक खाद्यपरंपरेचा प्रभाव नैवेद्यावर दिसून येतो. उपलब्ध धान्य, कडधान्ये, भाज्या आणि घरातील पारंपरिक पाककृती यानुसार नैवेद्याचे पदार्थ ठरतात. त्यामुळे एकाच सणासाठी तयार होणाऱ्या नैवेद्यातही घराघरांत वेगवेगळी चव पाहायला मिळते. त्याचबरोबर पूर्वी घरातच पूर्ण फराळ तयार होत होता. आता मात्र, बाजारातून खरेदी करून आणला जात असल्याचे गृहिणींनी सांगितले. -------------------- परंपरा कायम, पदार्थांमध्ये बदल पूर्वी नैवेद्यासाठी घरातील महिलाच बहुतांश पदार्थ घरीच तयार करीत. आजही ही पद्धत अनेक घरांत कायम असली, तरी वेळेअभावी काही पदार्थ बाहेरून आणले जातात. तसेच नव्या पिढीच्या आवडीनुसार पनीरच्या भाज्या, पुलाव, विविध मिठाई, केक किंवा इतर पदार्थांचीही नैवेद्यात भर पडत आहे. मात्र, पारंपरिक पदार्थांना मिळणारे स्थान अजूनही कायम आहे. --------------- ((कोट)) गौरीचा नैवेद्य हा केवळ जेवणाचा भाग नसून तो कुटुंबाच्या परंपरा, स्थानिक खाद्यसंस्कृती आणि श्रद्धेचे प्रतीक आहे. प्रत्येक घरातील नैवेद्याची पद्धत वेगळी असली तरी त्यामागील भावना एकच असते. बदलत्या काळानुसार काही पदार्थ बदलले तरी पुरणपोळी, अळूवडी, खीर, लाडू यांसारख्या पारंपरिक पदार्थांशी असलेले नाते आजही कायम आहे. -छाया भारती, भाविका ------------------ पारंपरिक गौरीला आधुनिक साज महालक्ष्मी बसवण्याची पद्धत ही वेगवेगळी आहे. कुणी धान्याच्या आरासवर, कुणी जात्यावर तर कुणी उभ्या गौरीची स्थापना केली आहे. पूर्वी वेळूच्या काड्यांचा सांगाडा करून पारंपरिक नऊवार साडी घालून त्या सजवण्यात येत होत्या. आता तर मखर, रेडिमेड गौरीसह लाइटिंग आणि अन्य देखाव्यांची त्यात भर पडली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Exam Latest Update : ...अखेर राज्यसेवा 2025 च्या मुलाखती ढकलल्या पुढे; नवी तारीख काय? मुख्य परीक्षेबाबत अद्यापही अस्पष्टता!

Rekha Gupta Organ Donation : पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी रेखा गुप्तांचा मरणोत्तर अवयवदानाचा संकल्प; नागरिकांनाही आवाहन

आमचे मार्ग आता जुळत नाहीत! Prithvi Shaw अन् आकृती अगरवाल यांचा वेगळा होण्याचा निर्णय; क्रिकेटपटूच्या पोस्टची चर्चा...

लग्नानंतर स्वयंपाक शिकली मेघना एरंडे; म्हणाली- माहेरची आणि सासरची लोकं गणेशोत्सवात आमच्या घरी येतात आणि...

Latest Marathi News Update : दिशा सालियनचे वडील वकिलांसोबत शनिवारी मातोश्रीवर जाणार; आदित्य ठाकरेंना स्वतः जाऊन अब्रुनुकसानीची देणार नोटीस

SCROLL FOR NEXT