औरंगाबाद : लस घ्या अन्यथा बुधवारपासून कारवाई sakal
छत्रपती संभाजीनगर

लस घेतली तरी करावी लागणार RTPCR; औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

जिल्हाधिकारी : तर मृतांच्या वारसांना तत्काळ मदतीचे निर्देश

सकाळ वृत्तसेवा

दुसऱ्या डोससाठी पात्र नागरिकांनी बुधवार (ता.१५) पर्यंत दुसरा डोस पूर्ण करावा, अन्यथा त्यांच्यावर दंडात्मक कारवाईचा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिला आहे.

औरंगाबाद : ओमिक्रॉन (Omicron) पासून बचाव करण्यासाठी लस (Vaccine) गरजेची आहे. दुसऱ्या डोससाठी पात्र नागरिकांनी बुधवार (ता.१५) पर्यंत दुसरा डोस पूर्ण करावा, अन्यथा त्यांच्यावर दंडात्मक कारवाईचा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण (Sunil Chavan) यांनी दिला आहे. तसेच कोविडमुळे मरण पावलेल्यांच्या वारसांना तत्काळ साहाय्य करण्याचे संबंधित यंत्रणेला निर्देश दिले आहेत. याशिवाय एक डोस घेतलेल्या व्यक्तींला दर १५ दिवसाला आणि अद्याप एकही डोस न घेतलेल्या व्यक्तीची प्रत्येक आठवड्याला आरटीपीसीआर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी (ता.नऊ) जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक झाली. या बैठकीत जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी निर्देश दिले. बैठकीला समितीची बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हा परिषद अध्यक्षा मीना शेळके, महापालिका प्रशासक आस्तिककुमार पांडेय, पोलिस उपायुक्त श्रीमती बनकर, निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा, डॉ. प्रदीप कुलकर्णी आदी अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी म्हणाले की, ओमिक्रॉन विषाणू रोखण्यासाठी लसीकरण आवश्‍यक आहे. लसीकरणाचा एक डोस घेतलेल्या व्यक्तींची दर १५ दिवसाला आणि लसीकरणाची एकही मात्रा न घेतलेल्या व्यक्तींची प्रत्येक आठवड्याला आरटीपीसीआर करा. शासननिर्देशांप्रमाणे कोविड-१९ मध्ये मृत्यू झालेल्यांच्या वारसांना आर्थिक मदत देण्याची कार्यवाही तातडीने करावी. सर्व महाविद्यालयांनी त्यांचे प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थ्यांचे लसीकरण झाले आहे याबाबतची खात्री करावी. लसीचा किमान एक डोस न घेतलेल्या विद्यार्थी/शिक्षकांना तसेच दुसऱ्या डोससाठी पात्र असूनही दुसरा डोस घेतलेला नाही असे विद्यार्थी/शिक्षकांना महाविद्यालयांमध्ये प्रवेश देण्यात येऊ नये, असे निर्देश दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी ओमायक्रॉनच्या पार्श्‍वभुमीवर आढावा बैठक घेतली. यावेळी उपस्थिती डावीकडून उपायुक्त उज्वला वनकर, पोलिस अधीक्षक निमित गोयल, श्री. चव्हाण, महापालिका आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय, निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल आदी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: मुंबईत संततधार! चार धरणं ओव्हरफ्लो; सातही जलाशयांची आकडेवारी समोर

WTC Final 2027 Venue: जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल कुठे होणार? भारतीय संघ पात्र ठरू शकणार का? ICC ची घोषणा...

Crime News: शाळेत १० रुपये चोरल्याचा आरोप; रागात शिक्षिकेकडून मारहाण, घरी येताच १० वर्षीय मुलीनं जीवन संपवलं

Latest Marathi Update : धुळे जिल्ह्यातील मुंबई आग्रा महामार्गावरील देवभाने फाट्यावर रास्ता रोको आंदोलन

Rahul Gandhi Protest : PM निवासस्थानाबाहेर घातपात करायचा होता का?; एकनाथ शिंदेंनी 'या' दोन माजी पंतप्रधानांचा दाखला देत राहुल गांधींवर डागली तोफ

SCROLL FOR NEXT