Aurangabad Gharkul Yojana News sakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : घरकुलाच्या नावाखाली सरकारकडून चेष्टा

इम्तियाज जलील : ८० हजारांपैकी केवळ ३५५ नागरिकांना मिळाली घरे

सकाळ ऑनलाईन टीम

औरंगाबाद : एकीकडे केंद्रशासन म्हणते की देशातील दोन कोटी नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घरे देण्यात आली आहेत. परंतु औरंगाबाद जिल्ह्यामध्ये गेल्या सहा वर्षात ८० हजार ५१८ अर्ज आले असून केवळ ३५५ नागरिकांनाच घरे मिळाली आहेत. ही बाब शहरासाठी लाजिरवाणी असून घरकुल योजनेसंदर्भात केंद्र, राज्य व जिल्हा प्रशासनाच्या उदासीनता व कार्यपद्धतीवर गंभीर स्वरूपाचे आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी सोमवारी (ता.३१) पत्रकार परिषदेत केले.(Aurangabad Gharkul Yojana News)

केंद्र शासनाने जाहीर केलेल्या सर्वांसाठी घरे २०२२ या संकल्पनेवर आधारित ‘प्रधानमंत्री आवास योजने’च्या मार्गदर्शक सूचनांमध्ये चार घटकांचा समावेश करण्यात आला आहे. यात औरंगाबाद महापालिकेने मोठा गाजावाजा करीत जून २०१६ मध्ये औरंगाबाद शहरातील गोरगरीब नागरिकांची ऑनलाइन पद्धतीने सर्व संबंधित कागदपत्रांसह झोपडपट्टी पुनर्वसनासाठी ४५६७ लाभार्थी, क्रेडिट लिंक- १२२५३ लाभार्थी,खाजगी भागीदारी मध्ये परवडणारे गृहनिर्माण म्हणजे फ्लॅट सिस्टीम- ५२८५६ लाभार्थी, स्वत:चे घर बांधकाम-१०८४२ लाभार्थी असे एकूण ८०,५१८ गोरगरीब लाभार्थ्यांचे अर्ज जमा करुण घेतले. यात केवळ स्वत:चे घर बांधकामात ३५५ लाभार्थ्यांना लाभ मिळाल्याची माहिती खासदार इम्तियाज जलील यांनी दिली.

राज्याच्या सचिवांना हजर राहण्याची नोटीस

घरकुल योजनेंतर्गत औरंगाबाद शहरातील गोरगरीब नागरीकांना आतापर्यंत घरे का देण्यात आली नाही ? याचा जाब विचारण्यासाठी औरंगाबादचे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका प्रशासक यांना पूर्वनियोजित दिल्ली येथील बैठकीत सर्व माहितीसह हजर राहण्याचे आदेश जारी करण्याची विनंती केंद्रीय समितीचे अध्यक्ष व अर्बन डेव्हलपमेंटचे सचिव यांच्याकडे इम्तियाज जलील यांनी केली होती. त्याअनुषंगाने केंद्रीय समितीच्या अध्यक्षांनी घरकुल योजनेतंर्गतचा सविस्तर अहवाल व माहितीसह राज्याच्या सचिवांना ९ फेब्रुवारीला दिल्लीत हजर राहण्याची नोटीस जारी केली आहे.

वाईन विकूनच दाखवा

राज्य सरकारने नुकतेच राज्यांमध्ये सुपरमार्केटमध्ये वाईन ठेवण्यास परवानगी देण्याचे आदेश काढले आहे. यावर इम्तियाज जलील यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. जिल्ह्यातील सुपरमार्केटमध्ये आणि दुकानात वाईन विकू दिले जाणार नाही, तर शिवसेनेच्या मंत्री व नेत्यांनी दुकानांचे उद्घाटन करावे आम्ही ती फोडून काढू, असे खुले आव्हान श्री. जलील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Medical Miracle: जन्मजात कान नसूनही येणार ऐकू; केईएमच्या डॉक्टरांनी १३ वर्षीय मुलाला दिले नवजीवन

Video Viral: अहो बाई काय हा प्रकार? हॉटेलमध्ये सहा जणांनी सातव्यासोबत रंगेहाथ पकडलं, त्यानंतर जे घडलं ते भयानक होतं

भाजीत मीठ कमी का? पत्नीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत छतावरून खाली दिलं फेकून; 5 महिन्यांच्या गर्भवतीचा दुर्दैवी अंत

धक्कादायक! भाजपचे आमदारांने महिलांचे केले शोषण; तृप्ती देसाईंचा गंभीर आराेप, मुख्यमंत्र्यांकडे केली राजीनाम्याची मागणी

Pralhad Joshi: इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण, दर वाढविण्यासाठी प्रयत्न : प्रल्हाद जोशी

SCROLL FOR NEXT