gay. 
छत्रपती संभाजीनगर

लम्पीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गोचीड निर्मुलन; पशुपालकांना न घाबरण्याचे आवाहन

मधुकर कांबळे

औरंगाबाद : राज्याच्या काही जिल्ह्यात जनावरांमध्ये दिसत असलेल्या लम्पी स्किन डिसीज या साथरोगाच्या प्रादुर्भावामुळे पशुपालक काळजीत पडले आहेत. गोचीड, गोमाशांपासून लम्पी स्किन डिसीजचे संक्रमण होते. त्यामुळे जिल्ह्यात गोचीड, गोमाशी निर्मुलन कार्यक्रम राबवण्यात आला आहे. लम्पीची जनावरात लक्षणे दिसल्यास पशुपालकांनी घाबरून न जाता जवळच्या पशु चिकित्सालयात दाखवावे.

लम्पी स्किन डिसीज विषाणूद्वारे हा आजार होतो. जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुरेखा माने म्हणाल्या, या आजाराची सुरुवात भारतात सर्वात प्रथम ऑगस्ट 2019 मध्ये ओडिसा येथून झाली, याचा प्रसार पश्चिम बंगाल, छत्तीसगड, तेलंगाना, आंध्र प्रदेश, केरळ, कर्नाटक या राज्यांत झालेला आहे. महाराष्ट्रात देखील काही जिल्ह्यामध्ये या रोगाच्या सदृश्य लक्षणे असलेले रुग्ण आढळून आली आहेत.

हा एक विषाणूजन्य (viral) रोग आहे, या रोगाचा प्रसार किटके जसे डास,   चावणाऱ्या माश्या, गोचीड इत्यादी मार्फत होतो, बाधित जनावरापासून या गोचीड व गोमाश्याद्वारे सुदृढ जनावरांना प्रसार केला जातो. उष्ण व आर्द्र हवामानात याचा जास्त प्रसार होतो. याची गाय वर्ग आणि म्हैस वर्गातील सर्व वयोगटातील जनावरांना बाधा होते. मात्र लहान वासरामध्ये रोगाची तीव्रता अधिक दिसून येते. याचा प्रसार साधारण 10 ते 20% जनावरांमध्ये होतो. तसेच यातील मरतुकीचे प्रमाण एक ते पाच टक्के इतके आहे.

लम्पीची लक्षणे... 

लम्पीच्या लक्षणांबाबत डॉ. माने म्हणाल्या, यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे जनावरांना ताप येणे, डोळ्यातून तसेच नाकातून स्राव होणे, भूक मंदावणे इ.  सुरुवातीचे लक्षणे दिसतात. नंतर डोके, मान, पाय, पाठ, इ. ठिकाणी दोन ते पाच सेंटीमीटर व्यासाच्या गाठी येतात, त्यातून पू येऊ शकतो. तसेच इन्फेक्शन नाकामध्ये गेले तर निमोनिया होऊ शकतो. गाभण जनावरे गाभडतात. जनावरांचे दूध उत्पादन कमी होते.

हा आजार विषाणूजन्य असल्याने त्यावर उपचार नाही, परंतु जखमामध्ये जिवाणूंचा संसर्ग होऊन दुय्यम आजार होऊ नये, म्हणून प्रतिजैविके पाच ते सात दिवस द्यावी लागतात, सोबत तापिसाठी औषधी द्यावी लागतात. त्याचबरोबरीने रोग प्रतिकारशक्ती वाढवणारे औषधीचा वापर करावा लागतो. ५ ते ७ दिवसाच्या नियमित योग्य उपचाराने हा आजार पूर्णपणे बरा होतो. सर्व उपचार पशुवैद्यकाच्या सल्ल्यानेच करावेत. पशुपालकांना या आजाराची लक्षणे आपल्या पशूंना दिसून आल्यास घाबरून न जाता नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यास संपर्क करून उपचार करून घ्यावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुरेखा माने यांनी केले आहे.

लम्पीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी... 

- प्रथम आजारी जनावरांना वेगळे करावे व त्याच्या खाद्य ,चारापाणी व्यवस्था वेगळी करावी. 
- हा आजार किटकांपासून प्रसार होत असल्याने आपल्या गोठ्यातील किटकांचा बंदोबस्त करावा लागेल. त्यासाठी जनावरांचा गोठा कोरडा आणि स्वच्छ ठेवावा लागेल. तसेच गोठ्याशेजारी पाणी, शेण, मुत्र जमा होऊन चिखल होणार नाही याची काळजी घ्यावी.  
- गोठ्यात असलेले कीटक मारण्यासाठी बाजारात उपलब्ध कीटनाशकांचा वापर करावा तसेच घरच्या घरी कीटकनाशक बनविण्यासाठी दहा लिटर पाण्यात 40 मिली करंज तेल, 40 मिलि निम तेल आणि 10 ग्राम अंगाची साबण चांगली मिसळून घ्यावी, हे द्रावण दिवसातून दोन ते तीन वेळा फवारल्यास आपल्या गोठ्यामध्ये सर्व प्रकारच्या कीटकांचे निर्मूलन होते व या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी मदत होऊ शकते.
- बाधित जनावराचे चारा पाणी वेगळीकडे करावे 
- बाधित जनावराच्या पासून 10 कि मी च्या परिसरात जनावरांचे बाजार ,पशु प्रदर्शने अथवा स्पर्धा बंद कराव्यात
- बाधित जनावरांच्या वापरासाठी वापरलेली अवजारे, वाहने 2 टक्के फिनॉल किंवा 1 टक्के फॉर्मलीन ने किंवा 2 ते 3 टक्के सोडियम hypochlorite ने 15 मिनिटासाठी निर्जंतुकी करणं करावे

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance Tips: हेल्थ इन्शुरन्स घेताना या गोष्टी तपासल्या नाहीत तर Claimच्या वेळी बसू शकतो मोठा धक्का!

IND vs WI: मॅचच्या काही तास आधी मोठं संकट! इकाना स्टेडियमजवळ गोमतीचं पाणी, अंडरपास जलमय; भारत-वेस्ट इंडिजच्या सामन्यावर प्रश्नचिन्ह?

‘मला पाहून महिला थुंकायला आणि चपलेने मारायला यायच्या’; दृश्यममधील गायतोंडे फेम कमलेश सावंत म्हणाले...‘ही खंत आयुष्यभर राहील’

Marathi News Live Updates: ऑक्टोबरच्या उकाड्यानंतर कर्जतला पहाटे दाट धुक्याची चादर; आल्हाददायक वातावरणाने नागरिक सुखावले

Kolhapur Gokul Election: ‘गोकुळ’च्या एका जागेवरून महायुतीत तिढा; राष्ट्रवादीला आणखी एक जागा, यड्रावकर गटाच्या जागेवरून घमासान

SCROLL FOR NEXT