Aurangabad News 
छत्रपती संभाजीनगर

ड्युटी करून घरी जाताना होते मनाची घालमेल

राजेभाऊ मोगल

औरंगाबाद : एकीकडे जगभरात कोरोनामुळे प्रत्येकजण भयभीत झाला आहे, तर दुसरीकडे या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी डॉक्टर्स, पोलिस आपले कर्तव्य बजावत आहेत. रस्त्यावर काम करून घरी गेल्यानंतर घरातील माणसांमध्ये मिसळण्याची भीती वाटते, त्यात पुन्हा आपल्यालाच घरातील देखील कामे करावे लागत असल्याने आणखी भीती निर्माण होत आहे. प्रत्येकजण स्वत:ची काळजी घेत असताना नेमके आम्हालाच काळजी घेता येत नसल्याची खंत कर्तव्यावरील कर्मचारी व्यक्त करीत आहेत. 

कोरोना विषाणूला रोखण्यासाठी कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना विविध ठिकाणी फिरावे लागते, अनेकांशी थेट संपर्क येतो. त्यामुळे विशेष काळजी घ्यावी लागत आहे. मास्कचा व सॅनिटायझरचा वापर करावा, असे आवाहन सर्वच करीत आहेत. मात्र, घरातील व्यक्तींच्या आरोग्याबाबत अधिक जागरूक राहावे. दैनदिन कर्तव्य पार पाडताना आपल्या आरोग्याचीही काळजी घ्यावी लागत आहे. 

कायदा सुव्यवस्थेचा ताण पोलिसांवर असतो. शहरातील वाहतूक व्यवस्था, गर्दीच्या ठिकाणी पोलिसांना कर्तव्य बजावावे लागते. सध्या कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी जिल्हा प्रशासनासोबतच पोलिसांना रस्त्यावर उतरावे लागले आहे. शाळा, महाविद्यालयांसह मंदिरे बंद आहेत. सर्वसामान्य नागरिकही आरोग्याची काळजी घेत आहेत. दुसरीकडे पोलिस ठाण्यात काम करणारे पोलिस मात्र स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो.

दररोज पोलिस ठाण्यात तक्रार देण्याबरोबरच विविध कामासाठी बहुसंख्य नागरिकांची ये-जा सुरू असते. संशयितांना जेरबंद करून त्यांची चौकशीची प्रक्रिया सुरू असते. त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयामध्ये न्यावे लागते. तारखेसाठी न्यायालयात न्यावे लागते. ही कामे करताना पोलिसांना आपल्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. 
 

आपल्याला लोकांमध्ये ड्युटी करावी लागते. अशा काळात कोरोनाच्या भीतीमुळे घरातून बाहेरही न निघणाऱ्या मुलांमध्ये मिसळताना, त्यांना जेवायला देताना भीती वाटते; मात्र परिस्थितीला सामोरे जावेच लागणार आहे. आपल्यावरील जबाबदारी निभावत असतानाच घरातील जबाबदाऱ्याही आरोग्याची काळजी घेत निभावत आहोत. 
- रूपा साकला, महिला पोलिस कर्मचारी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video : विनायक चतुर्थीनिमित्त अन्नदान कार्यक्रमात दुर्दैवी अपघात; गरम सांबारच्या भांड्यात पडून महिलेचा मृत्यू,थरकाप उडवणारा व्हिडिओ

Maharashtra Rain Alert : राज्यात परतीच्या पावसाचा जोर वाढणार; विदर्भ-मराठवाड्यासह २९ जिल्ह्यांना येलो अलर्ट

Chana Moong Dal Chilla: हेल्दी नाश्ता म्हणजे बेचव नाही! असा बनवा चणे-मूग चिला! खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल

आजचे राशिभविष्य - 23 सप्टेंबर 2026

Azamgarh Hostage Crisis : आझमगढ हादरलं! आधी पत्नी अन् दोन पुजाऱ्यांची हत्या, मग मुलावर झाडली गोळी; ८ तासांच्या ऑपरेशननंतर आरोपीचा एन्काउंटर

SCROLL FOR NEXT