छत्रपती संभाजीनगर

सोन्याच्या दागिन्यांचे हॉलमार्किंग महागले

CD
सोन्याच्या दागिन्यांचे हॉलमार्किंग महागले ---- बीआयएसचा निर्णय, प्रति दागिना शुल्क ४५ वरून ८८.५० रुपये ---- सकाळ वृत्तसेवा छत्रपती संभाजीनगर, ता. २१ ः सणासुदीच्या आणि लग्नसराईच्या काळात सोन्याचे दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या खिशाला आणखी कात्री लागणार आहे. भारतीय मानक ब्यूरो अर्थात बीआयएसने सोन्याच्या दागिन्यांच्या हॉलमार्किंग शुल्कात तब्बल ६६.७ टक्क्यांची वाढ केली. त्यामुळे आता प्रति दागिना हॉलमार्किंग शुल्क ४५ रुपयांवरून ७५ रुपये झाले आहे. हे नवे दर १४ सप्टेंबर २०२६ पासून देशभरात लागू करण्यात आले आहेत. या ७५ रुपयांच्या मूळ शुल्कावर १८ टक्के जीएसटी स्वतंत्रपणे आकारला जातो. त्यानुसार १३ रुपये ५० पैसे कर धरून ग्राहकांना किंवा सुवर्ण व्यावसायिकांना एका दागिन्याच्या हॉलमार्किंगसाठी एकूण ८८ रुपये ५० पैसे मोजावे लागतील. दुसरीकडे चांदीच्या दागिन्यांच्या हॉलमार्किंग शुल्कात कोणताही बदल करण्यात आलेला नसून ते पूर्वीप्रमाणेच प्रति वस्तू ३५ रुपये इतकेच कायम ठेवण्यात आले आहे. ---- वजनानुसार नाही तर प्रति वस्तू आकारणी हॉलमार्किंग शुल्काची आकारणी सोन्याच्या वजनावर न होता ती प्रति वस्तू केली जाते. म्हणजेच एक ग्रॅमची अंगठी असो किंवा अनेक तोळ्यांचा हार प्रत्येकासाठी सारखेच शुल्क लागू होते. यामुळे या दरवाढीचा सर्वाधिक परिणाम हलक्या वजनाचे दागिने जसे की नथ, लहान अंगठी, पेंडंट किंवा लहान साखळ्या खरेदी करणाऱ्यांवर होणार आहे. कमी वजनाच्या दागिन्यांवर हे वाढीव शुल्क प्रति ग्रॅमच्या प्रमाणात अधिक भासणार आहे. -- सुवर्ण व्यावसायिकांकडून नाराजी ऑल इंडिया जेम ॲण्ड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिल अर्थात जीजेसी या शिखर संस्थेने या दरवाढीवर चिंता व्यक्त केली आहे. आधीच सोन्याचे दर उच्चांकावर असताना हॉलमार्किंग शुल्कात थेट ६७ टक्के वाढ करणे योग्य नाही. या वाढीव खर्चाचा थेट भार ग्राहकांच्याच खिशावर पडेल, असे मत सुवर्ण व्यावसायिकांनी व्यक्त केले आहे. --- ग्राहकांनी काय काळजी घ्यावी दागिना खरेदी करताना त्यावर बीआयएसचा लोगो, कॅरेटची शुद्धता आणि सहा अंकी अल्फान्यूमेरिक एचयूआयडी क्रमांक तपासणे आवश्यक आहे. बीआयएस केअर या मोबाइल ॲपच्या माध्यमातून ग्राहक आपल्या दागिन्यांच्या हॉलमार्किंगची सत्यता स्वतः पडताळू शकतात. दागिन्यांचे मूळ बिल घेताना त्यामध्ये सोन्याचा दर, घडणावळ, कर आणि हॉलमार्किंग शुल्क याची स्वतंत्र नोंद तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Chairman Salary: Tata Sons च्या चेअरमनला किती पगार मिळतो? नोएल टाटांच्या विरोधानंतर पद पुन्हा चर्चेत; आकडा पाहून धक्का बसेल!

Akola News : जिल्हाधिकाऱ्यांनी सोडले शेतकऱ्यांना वाऱ्यावर; महाबीज प्रशासनाकडून माहिती देण्यास नकार, एमडींनीही केले हात वर

Ai+ Nova 2 Power 5G भारतात लाँच! 16,999 रुपयांत खरेदीची संधी...पाहा फीचर्स अन् ऑफर्स!

Katraj Kondhwa Road Issue : आयुक्तांचे आश्वासन विरणार हवेत! कात्रज कोंढवा रस्ता; उर्वरित १० मिळकतींमुळे रस्ता रुंदीकरण रखडणार

Farmer Agitation : शेतकरी संकटात, सरकार कुठंय? लोहाऱ्यात हजारो शेतकऱ्यांचा आक्रोश; आमदारांना बोलण्यास मनाई करत शेतकऱ्यांनी सोयाबीन उधळले

SCROLL FOR NEXT