raju shetty sakal
छत्रपती संभाजीनगर

सरकारमधून बाहेर पडले तर...; मध्यावधी निवडणुकीबाबत राजू शेट्टींचा दावा

लोकांनी आजवर मुंबईत गॅंगवॉर पाहिले आहे. मात्र, सध्या राज्याच्या राजकारणात राजकीय टोळीयुद्ध सुरू असल्याचे जनता अनुभवत असल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी व्यक्त केले.

सकाळ वृत्तसेवा

लोकांनी आजवर मुंबईत गॅंगवॉर पाहिले आहे. मात्र, सध्या राज्याच्या राजकारणात राजकीय टोळीयुद्ध सुरू असल्याचे जनता अनुभवत असल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी व्यक्त केले.

औरंगाबाद - लोकांनी आजवर मुंबईत (Mumbai) गॅंगवॉर पाहिले आहे. मात्र सध्या राज्याच्या राजकारणात (Politics) राजकीय टोळीयुद्ध (Political War) सुरू असल्याचे जनता अनुभवत असल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी व्यक्त केले. राज्यात मध्यावधीची शक्यता फेटाळून ते म्हणाले, सरकारमधून कोणीही बाहेर पडणार नाही. कारण बाहेर पडले तर ईडी आणि इन्कम टॅक्सविभाग आहेच, असंही त्यांनी सांगितले.

सुभेदारी विश्रामगृहात प्रसार माध्यमांशी संवाद साधताना शेट्टी म्हणाले, राज्यातील महाविकास आघाडी सरकारला आमचा पाठींबा आहे मात्र यापुढे आघाडीसोबत रहायचे किंवा नाही याचा विचार सुर आहे. एका प्रश्‍नावर ते म्हणाले, सर्वच क्षेत्रात साम्राज्यवाद आहे. राजकारणातही मोठे पक्ष छोट्या पक्षांना गिळण्याचा प्रयत्न करत असतात. पण हा कृतघ्नपणा आहे आधी छोट्या पक्षाची मदत घ्यायची आपली माणसे निवडून आणायची , सत्ता स्थापन करायची आणि नंतर छोट्या पक्ष, संघटनातील लोकप्रतिनिधींना अमिषे दाखवायची.

हे छोट्या संघटनेतील प्रतिनिधी सामान्य कुटूंबातुन, चळवळीतुन आलेली असतात दुर्दैवाने अलिकडच्या काळात या अमिषांना, प्रलोभनांना ते बळी पडत आहेत. हे केवळ स्वाभिमानीच्या बाबतीतच घडले असे नाही अन्य पक्षांच्या बाबतीतही घडते आहे म्हणून आपण प्रयत्न करायचे सोडून द्यायचे नसतात. चांगुलपणावर अजूनही विश्‍वास ठेऊन आपण प्रयत्न करत रहायचे. छोट्या पक्ष, संघटनांनीही आता आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे.

संस्कार करूनच लोकप्रतिनीधी तयार केले तरच ते निष्ठेने पक्षाचे काम करतील असे मत व्यक्त केले. राज्यात मध्यावधीची शक्यता फेटाळून ते म्हणाले, सरकारमधून कोणीही बाहेर पडणार नाही. कारण बाहेर पडले तर ई डी आहे, इन्कम टॅक्स आहे शिवाय तुरूंग वाट पाहत आहेत यामुळे एकमेकांवर विश्‍वास नसला तरी मुदत संपेपर्यंत सरकार स्थिर राहील असे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipith Highway Route Map : शक्तिपीठ महामार्गाच्या बदलेल्या मार्गात ८ जिल्ह्यांचा नवा नकाशा, लांबी वाढणार, कोकणाचं निसर्ग सौंदर्य संपणार

Bank Holiday: आज गुड फ्राइडेनिमित्त महाराष्ट्रात बँका बंद? पुढचे 2 दिवसही सुट्टी? जाणून घ्या RBIची अपडेट

सगळ्यांसमोर रणवीरने शेफालीला उचलताच भडकली दीपिका, सोशल मीडियावर VIRAL VIDEO

Latest Marathi News Live Update : 'INS तारागिरी'आज भारतीय नौदलात दाखल होणार

US Tariffs Policy : इराण युद्धादरम्यान ट्रम्प यांची नवी चाल, औषधांवर लावला १०० % टॅरिफ, न्यायालयाने फटकारल्यानंतरही धोरण कायम

SCROLL FOR NEXT