Aurangabad News 
छत्रपती संभाजीनगर

बामुतील १७ मार्चपासूनच्या पदवी परीक्षा रद्द

अतुल पाटील

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील १७ मार्चपासून सुरू होणाऱ्या पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा रद्द झाल्या आहेत. या परीक्षा ३१ मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. विद्यापीठातील सर्व पदव्युत्तर विभाग व संलग्नित महाविद्यालयांच्या तासिकांना ३१ मार्चपर्यंत सुट्टी असणार आहे. विद्यार्थ्यांनाही वसतिगृहे खाली करावी लागणार आहेत. तर प्राध्यापकांनाही २५ मार्चपर्यंत विद्यार्थ्यांना वसतिगृह खाली करावी लागणार आहेत. अशी माहिती कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी सकाळला दिली.

राज्य शासनाच्या उच्च शिक्षण विभागातर्फे कोरोना विषाणू (कोव्हीड-१९)चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. साथरोग प्रतिबंधात्मक कायद्यानुसार अधिसूचना काढली आहे. राज्यातील सर्व सरकारी, अनुदानित, खाजगी, शैक्षणिक संस्था, महाविद्यालय, अकृषी विद्यापीठे, तंत्रशास्त्र विद्यापीठे, तंत्रनिकेतने, अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र, कला महाविद्यालय यांच्या ३१ मार्चपर्यंत होणाऱ्या सर्व परीक्षा व प्रात्यक्षिके पुढे ढकलण्यात आली आहेत. एक एप्रिल पासूनची परीक्षा व प्रात्यक्षिके पूर्व नियोजित वेळापत्रकानुसार होतील.

या ठिकाणच्या प्राध्यापकांना २५ मार्चपर्यंत घरी राहून कामकाज करता येणार आहे. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास किंवा प्रशासकीय कारणास्तव संबंधित विद्यापीठाचे कुलगुरु, प्रकुलगुरु, कुलसचिव, उपकुलसचिव तसेच महाविद्यालय, तंत्रनिकेतनचे प्राचार्य, संचालक, अधिष्ठाता यांनी निर्देश दिल्यास अध्यापकांना तातडीने हजर राहणे बंधनकारक राहील. यावेळी प्रमुखांसह शिक्षकेतर कर्मचारी यांनी नियमित रित्या कार्यालयामध्ये उपस्थित राहणे आवश्यक आहे. विद्यापीठात परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. गणेश मंझा यांनीही परिपत्रक काढून संबंधितांना कळविले आहे.


अध्यापक यांनाही २५ मार्चपर्यंत घरी राहून कामकाज करता येणार आहे. कोरोना विषाणूची परिस्थिती पाहून याबाबत कालावधी वाढवण्याबाबत निर्णय घेण्यात येईल.
- डॉ. प्रमोद येवले, कुलगुरु
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM: भारतीय संघाचा वर्ल्ड रेकॉर्ड! T20I क्रिकेटमध्ये आजपर्यंत कोणीच न केलेला पराक्रम करून दाखवला

Govinda Insurance: गोविंदांसाठी आनंदाची बातमी! २ लाख गोविंदांना मिळणार विमा संरक्षण; दहीहंडीपूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय

Nanded News: नांदेड जिल्हा बँक निवडणुकीचा आज देगलूरात फैसला; सहकारातील राजकीय चुरस शिगेला

नव्या मुख्य सचिवांच्या नियुक्तीनंतर प्रशासनात मोठा बदल; २० IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, जाणून घ्या यादी...

Farmer Loan Waiver List : सिंधुदुर्गातील 307 गावांतील शेतकऱ्यांसाठी खूशखबर! 'कर्जमुक्ती'ची पहिली यादी जाहीर; 6,711 शेतकरी पात्र, 53 कोटींहून अधिक निधी अपेक्षित

SCROLL FOR NEXT