Crime News Sakal
छत्रपती संभाजीनगर

Crime News : मायेलेकीच्या नात्याला काळीमा! धनाच्या लोभापायी पोटच्या मुलीला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न

घटनेनंतर घरातच ठेवले ५ दिवस डांबून

सकाळ डिजिटल टीम

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर येथे मायलेकरांच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. एका आईने धनाच्या लोभापायी मैत्रिणीच्या सांगण्यावरून आपल्या २० वर्षाच्या पोटच्या मुलीला जाळण्याचा प्रयत्न केला. जाळल्यानंतरही तिचा मृत्यू न झाल्याने तिला घरातच ५ दिवस डांबून ठेवले. या प्रकरणावरून सदर आईविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहितीनुसार, सुप्रिया दादासाहेब हलमुख (वय २०) असं पीडित तरूणीचे नाव असून ती आपली आई पार्वती हलमुख (वय ४०) हिच्यासोबत शहरातील फुलेनगर परिसरात राहते. सुप्रियाच्या वडिलांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले असल्याने ती आपल्या आई आणि भावासोबत राहते.

पण १७ ऑगस्ट रोजी ती एका खासगी कंपनीत काम करून घरी परतून झोपी गेली असता मध्यरात्रीच्या सुमारास तिच्या आईने अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. तिने आरडाओरड केल्यावर भावाने तात्काळ धाव घेऊन आग विझवली. या घटनेमध्ये ती गंभीर जखमी झाली आहे.

घटना घडल्यानंतरही पार्वती नावाच्या आईवर काहीच परिणाम झाला नाही. तिने लेकीला घरातंच डांबून ठेवले होते. पण पाच दिवसानंतर आई घराच्या बाहेर गेल्याचा फायदा घेत सुप्रियाने थेट सिडको पोलिस स्टेशन गाठले आणि आईविरोधात तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी जादूटोणा करणाऱ्या महिलेवर आणि आरोपी आईवर गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, पार्वतीने आपली मैत्रीण शकुंतला आहेर हिच्या सांगण्यावरून हे कृत्य केल्याची धक्कादायक माहिती पोलिसांनी केलेल्या तपासातून समोर आली आहे. शकुंतला ही जादूटोणा करून अनेकांना फसवण्याचे प्रकार करते. "तू जर तुझ्या मुलीला जिवंत जाळून मारले तर तुला चांगला धनलाभ होईल आणि तुझ्या मुलाचेसुद्धा चांगले होईल" असं शकुंतला हिने पार्वतीला सांगितले होते. तिच्या सांगण्यावरून पार्वतीने हे कृत्य केले पण सुदैवाने मुलगी वाचली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trumpet Symbol: शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दिलासा! 'तुतारी'बाबत निवडणूक आयोगानं दिला मोठा निर्णय

Pune Politics : बंडखोर नक्की कोणाचा करणार गेम? माघारीसाठी सर्वच पक्षाचे नेते लागले कामाला!

Shrinivas Vanaga: "षडयंत्र रचून माझं तिकीट कापलं"; अज्ञातवासातून घरी परतेलल्या श्रीनिवास वानगांचा गंभीर आरोप

रणबीरमुळे Anushka Sharma ने ‘तमाशा’ चित्रपट सोडला, म्हणाली - हा चित्रपट नाकारला कारण...

घराघरात टीव्ही पोहोचवण्याचं स्वप्न बघणारे BPLचे फाऊंडर टी.पी. गोपालन नांबियार यांचं निधन

SCROLL FOR NEXT