छत्रपती संभाजीनगर

पशुधनासाठी हिरव्या चाऱ्याची पेरणी!

CD
पशुधनासाठी हिरव्या चाऱ्याची पेरणी! ------ राघुचीवाडी शिवारात २५० एकरांवर लागवड; तीन हजार टन उत्पादनाचे उद्दिष्ट --- धाराशिव, ता. १ (बातमीदार) ः जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती आणि आगामी काळातील संभाव्य चाराटंचाई लक्षात घेऊन पशुधनासाठी हिरव्या चाऱ्याची उपलब्धता वाढविण्याच्या दृष्टीने तालुक्यातील राघुचीवाडी शिवारातील २५० एकरवर चारालागवड सुरू करण्यात आली. यासाठी परिसरातील १६० शेतकऱ्यांना कडवळचे एक हजार किलो बियाणे मोफत वितरित करण्यात आले आहे. यातून हेक्टरी सुमारे ३० टनाप्रमाणे तीन हजार टन हिरव्या चाऱ्याचे उत्पादन अपेक्षित आहे. दुष्काळात पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता वाढण्यासोबतच शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचे नवे साधन निर्माण होणार असल्याचा विश्‍वास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे. राघुचीवाडी शिवारात शनिवारी (ता. ३१) आमदार पाटील यांच्या उपस्थितीत चारालागवडीचा प्रारंभ करण्यात आला. जिल्ह्यात यंदा पावसातील मोठ्या खंडामुळे आगामी काळात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर उपलब्ध पाण्याचा योग्य विनियोग करून चारा उत्पादन वाढविण्याचा विचार पुढे आला. धाराशिव शहरातील सांडपाणी भोगावती नदीच्या माध्यमातून राघुचीवाडी तलावात जमा होते. या तलावातील उपलब्ध पाण्याचा उपयोग चारानिर्मितीसाठी करता येऊ शकतो, अशी संकल्पना आमदार पाटील यांनी परिसरातील शेतकऱ्यांसमोर मांडली असता, त्यांनी याला सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून आवश्यक परवानगी देण्याबाबत सूचना केली होती. त्यानुसार पाणीउपसा सुरू करण्यास परवानगी मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध करून देण्यात आले. शनिवारी (ता. ३१) तेथे चारालागवडीचा प्रारंभ करण्यात आल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. राघुचीवाडी तलावातील उपलब्ध पाण्याचा नियोजनबद्ध वापर करून चारा उत्पादन करण्याचा हा उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येत आहे. या प्रयोगाला यश मिळाल्यास जिल्ह्यातील अन्य भागांतही उपलब्ध जलस्रोतांचा योग्य वापर करून चारा उत्पादन वाढविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम दिशादर्शक ठरू शकतो, असे आमदार पाटील यांनी सांगितले. -----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पंजाबमध्ये निवडणुकीआधी 'आप'ला धक्का, २ आमदारांनी दिला राजीनामा; कारण आलं समोर

कोण आहेत वृंदावनातील Gen Z बाबा? १९व्या वर्षी बनले भागवत कथावाचक, सोशल मीडियावर होतेय चर्चा

Irrigation Department Engineer : स्वेच्छेने पैसे दिले तर स्वीकारतो!; जलसंपदा विभागाच्या इंजिनियरच अजब वक्तव्य, सरकारकडून तातडीने केली कारवाई

Latest Marathi News Update : सांगली जिल्हा बँकेसाठी चुरशीने मतदान

Smile Day: सहजच सगळे हसत जगुया चला… हास्यदिनाच्या निमित्ताने..

SCROLL FOR NEXT