Ghrishneshwar Temple Esakal
छत्रपती संभाजीनगर

Grishneshwar Temple: घृष्णेश्वर मंदिर सहा महिने बंद राहणार नाही;जिल्हाधिकाऱ्यांचे वेरूळ येथील शिष्टमंडळाला आश्वासन

Grishneshwar Temple Development, Verul Traffic Issue, Six Month Closure घृष्णेश्वर मंदिर परिसरातील विकासकामांबाबत स्थानिक व्यापारी व ग्रामस्थांनी निवेदन दिले. मंदिर सहा महिने बंद न ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आश्वासन दिले.

सकाळ वृत्तसेवा

खुलताबाद : श्री क्षेत्र घृष्णेश्वर मंदिर परिसरातील प्रस्तावित विकासकामांच्या पार्श्वभूमीवर मंदिर दीर्घकाळ बंद ठेवण्यात येऊ नये, अशी मागणी वेरूळ येथील स्थानिक व्यापारी, ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधींच्या संयुक्त शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. यावर मंदिर पूर्ण सहा महिने बंद ठेवले जाणार नसून, काम करताना कालावधी अत्यंत कमीत कमी ठेवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न राहील, असे सकारात्मक आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

सध्या पर्यटन व यात्रांचा मुख्य हंगाम सुरू होत आहे. अशा वेळी विकासकामांच्या नावाखाली मंदिर महिनानमहिने बंद राहिल्यास स्थानिक दुकानदार, लॉजचालक, हॉटेल व्यावसायिक तसेच पर्यटनावर उदरनिर्वाह असणाऱ्या शेकडो कुटुंबांवर उपासमारीची वेळ येईल, अशी चिंता शिष्टमंडळाने व्यक्त केली. विकासकामांना स्थानिकांचा पूर्ण पाठिंबा असून, कामे करताना भाविक आणि व्यावसायिकांचे नुकसान होणार नाही,

यादृष्टीने नियोजन करण्याची विनंती यावेळी करण्यात आली. शिष्टमंडळात श्री घृष्णेश्वर दुकानदार असोसिएशनचे अध्यक्ष गणेश हजारी, वेरूळ लेणी दुकानदार संघटनेचे अध्यक्ष मकरंद आपटे, जिल्हा परिषद सदस्य तथा घृष्णेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष कुणाल दांडगे, गोपाल गिरी, विजय भालेराव, मिलिंद शेवाळे, प्रकाश पाटील, जितेंद्र हजारी, बाळू ठाकरे, सलमान पठाण, सतीश लोखंडे यांच्यासह मोठ्या संख्येने व्यावसायिक व ग्रामस्थ उपस्थित होते.

वाहतूक नियोजनाचा फज्जा

घृष्णेश्वर मंदिर परिसरातील प्रस्तावित भुयारी मार्गाच्या कामाला गुरुवारी (ता. एक) सुरवात झाली. पण, प्रशासनाने पर्यायी वाहतुकीची ठोस व्यवस्था करण्यापूर्वीच प्रमुख रस्ता बंद केल्याने वेरूळमध्ये भाविक, पर्यटक आणि स्थानिकांची प्रचंड गैरसोय झाली. सकाळपासूनच पोलिसांनी जागोजागी बॅरिकेड्स लावून रस्ते अडवल्याने भाविकांना उन्हात दूरवरून पायी चालण्याची कसरत करावी लागली.

सकाळी आठपासून भोसले चौक, महावीर चौक, शिवालय तीर्थकुंड तसेच विद्युत उपकेंद्राजवळील पुलाच्या परिसरात पोलिसांनी रस्त्याच्या मध्यभागी बॅरिकेड्स उभारले. त्यामुळे दर्शनासाठी आलेल्या वाहनांना दूरच रोखण्यात आल्याने भाविकांचे मोठे हाल झाले. विशेष म्हणजे, प्रशासकीय बैठकीत भुयारी मार्गाच्या कामासाठी केवळ जड वाहनांची वाहतूक सहा महिन्यांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय झाला होता. मात्र, प्रत्यक्षात पोलिसांनी दुचाकी वगळता चारचाकी वाहने आणि प्रवासी रिक्षांनाही प्रवेश नाकारल्याने मोठा गोंधळ उडाला. प्रशासनाने तातडीने सुटसुटीत पर्यायी मार्ग निश्चित करावा, अशी मागणी केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नवरात्र उत्सवाच्या बैठकीला गेले अन् एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूची बातमी कळली; वडील जागीच सुन्न... दिवेआगर घटनेवर अजूनही विश्वास नाही

Balapur October Heat : तूर, कपाशी ऑक्टोबर हीटच्या तडाख्यात ; पाणी विकत घेऊन सिंचनाची वेळ; दररोज १५०० रुपयांपर्यंत अतिरिक्त खर्च

Latest Marathi News Live Update : गांधी जयंतीनिमित्त राहुल गांधींनी राजघाटावर महात्मा गांधींना आदरांजली वाहिली

Manmad Indore Railway Project : मनमाड-इंदूर रेल्वेसाठी 4,930 कोटींची निविदा; महू-ग्यासपूरखेडी 72.66 किलोमीटर मार्ग; 48 महिन्यांची कामासाठी मुदत

'मी गरोदर राहिल्यानंतर सुद्धा...' ट्रोलिंगवर हृता दुर्गुळे स्पष्टच बोलली, म्हणाली; 'अमराठी मुलाशी लग्न केलं म्हणूनही...'

SCROLL FOR NEXT