छत्रपती संभाजीनगर

दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या कुटुंबांसोबत आमदार नारायण कुचे यांनी साजरी केली दिवाळी : वरुडी, बदनापूर व रामखेडा येथे गरजूंना किराणा किटचे वाटप, सामाजिक बांधिलकीतून दीपोत्सवाचा आनंद

CD
गरजूंना किराणा किटचे वाटप बदनापूर, ता. ९ (बातमीदार) : आमदार तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष नारायण कुचे यांच्या वतीने रविवारी (ता. आठ) बदनापूर विधानसभा मतदारसंघातील वरुडी, बदनापूर शहर आणि रामखेडा येथे गरजू कुटुंबांना किराणा किटचे वाटप करण्यात आले. गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी आणि मजूर बांधवांसोबत दिवाळीचा आनंद वाटून घेत या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपण्यात आली. आमदार नारायण कुचे म्हणाले, यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिकांसमोर अनेक आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. अशा परिस्थितीत दिवाळीसारख्या सणाचा आनंद प्रत्येक कुटुंबाला घेता यावा, ही आमची भावना आहे. आर्थिक अडचणीत असलेल्या कुटुंबांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्यासाठी किराणा किटचे वाटप हा छोटासा प्रयत्न आहे. या उपक्रमाप्रसंगी भाजप जालना ग्रामीण जिल्हा सरचिटणीस अनिलराव कोलते, हरिश्चंद्र शिंदे, भगवान मात्रे, भगवान बारगजे, राधाकिसन शिंदे, पुरुषोत्तम जोशी, भीमराव जावळे, अरुण पठाडे, सुरेश लहाने, संजय अंभोरे, नामदेव गिते, बदनापूरचे नगराध्यक्ष संतोष पवार, माजी नगराध्यक्ष सत्यनारायण गिल्डा, गटनेते बाबासाहेब कऱ्हाळे, माजी नगराध्यक्ष जगन्नाथ बारगजे, विलास जऱ्हाड, पद्माकर जऱ्हाड, गोरख खैरे, युनूस गुड्डू, दीपक मंडलिक, राहुल वाहुळ, जितेंद्र कुलकर्णी, गोरख रसाळ उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Politics : "गोकुळचं दार मी उघडलं म्हणून..."; महायुतीच्या दोन बड्या मंत्र्यांवर सतेज पाटलांचा थेट प्रहार!

AI Hallucination: धक्कादायक! सरकारी आदेशातच चक्क सुप्रीम कोर्टाचे बनावट निकाल? मुंबई उच्च न्यायालयाने काय केले पाहा...

Diwali Bank Holiday: नोव्हेंबरमध्ये बँकांना सुट्ट्यांची मेजवानी! महाराष्ट्रासह 'या' ३ राज्यांत राहणार बंद; पाहा संपूर्ण वेळापत्रक

Rocket Firecrackers Ban: दिवाळीच्या उत्साहावर नियमांचं बंधन! मुंबईत रॉकेट फटाक्यांवर बंदी; महापालिकेचा मोठा निर्णय

Maharashtra Live News: अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये फटाक्यांच्या पैशांवरून झालेल्या वादातून रक्तरंजित हल्ला; एकाचा उपचारादरम्यान मृत्यू, तर दोघे गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT