संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
छत्रपती संभाजीनगर

भाजीपाला विक्रीसाठी होणाऱ्या गर्दीवर केला हा उपाय...वाचा

राजेभाऊ मोगल

औरंगाबाद - कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी शहरातील नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन वारंवार केले जात आहे; मात्र कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाला खरेदीसाठी नागरिकांची रोज गर्दी होत आहे. म्हणून संचारबंदीच्या काळात शहरासह जिल्ह्यातील खुल्या जागा भाजीपाला विक्रेत्यांना उपलब्ध करून देण्यात याव्यात, असे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी महादेव किरवले यांनी दिले आहेत. 

नागरिक ऐकेनात
केंद्र शासनाने कोरोना व्हायरसच्या पार्श्‍वभूमीवर १४ एप्रिलपर्यंत देशभर लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापूर्वी राज्य शासनाने ३१ मार्चपर्यंत राज्यात संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला होता. संचारबंदीच्या काळात नागरिकांनी घराबाहेर पडू नये, जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा जाणवणार नाही. त्यामुळे किराणा दुकाने, भाजीपाला खरेदीसाठी गर्दी करू नये, असे आवाहन वारंवार केले जात आहे. तरीही नागरिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाला खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी करीत आहेत. यासंदर्भात महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (ता. २६) बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी महादेव किरवले, औरंगाबाद फर्स्टचे अध्यक्ष मानसिंग पवार, माजी अध्यक्ष ऋषी बागला, कार्यकारी सचिव हेमंत लांडगे, अर्जुन पवार, सौरभ साहुजी, महापालिकेचे शहर अभियंता सखाराम पानझडे यांची उपस्थिती होती. 

आदेशात म्हटलंय काय
आयुक्तांनी किराणा, दूध यांसह जीवनावश्‍यक वस्तूंच्या पुरवठ्याबाबत आढावा घेतला. त्यानंतर शुक्रवारी (ता.२७) श्री. किरवले यांनी बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे, की बाजार समितीमध्ये होणाऱ्या गर्दीचा विचार करता, भाजीपाला विक्रीसाठी मोकळी मैदाने उपलब्ध करून दिल्यास ही गर्दी होणार नाही. त्यामुळे शहर, जिल्ह्यातील खुल्या जागा संचारबंदीच्या काळात विक्रेत्यांना उपलब्ध करून देण्यात येतील. 

दिवसभर दुकाने उघडी ठेवा 
रास्त भाव दुकान त्यांना नेमून दिलेल्या वेळेत म्हणजेच सकाळी ८ ते दुपारी १२ आणि दुपारी ४ ते रात्री ८ यादरम्यान उघडी राहतील; तसेच गर्दी लक्षात घेऊन आवश्‍यकतेनुसार पूर्ण दिवसभर ही दुकाने सुरू राहतील. सध्या दुकानदारांकडे उपलब्ध गहू, तांदूळ, साखर हे ज्या कार्डधारकाला अनुज्ञेय आहे अशा सर्व कार्डधारकांना शासकीय दरात देण्याचे आदेश अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांना देण्यात आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: शेअर बाजार किरकोळ वाढीसह बंद; पॉवर शेअर्स बनले 'सुपरस्टार'

IPL 2024: केकेआरचा स्टार खेळाडू आता बॉलिवूडमध्ये करणार एन्ट्री; स्मृती मानधनाच्या बॉयफ्रेंडनं दिली संधी

Crime News : बुलढाणा जिल्ह्यात एकाच दिवशी 22 डीजे वर कारवाई; 6 लाख 32 हजार दंड, व गुन्हे दाखल

Latest Marathi News Live Update : अमेठी-रायबरेलीमधून राहुल-प्रियांका यांच्या उमेदवारीबाबत जयराम रमेश काय म्हणाले?

Rahul Gandhi: निवडणुकीत पाकिस्तानची एन्ट्री! 'राजकुमाराला पंतप्रधान बनवण्यास पाकिस्तान आतुर', मोदींचा राहुल यांच्यावर निशाणा

SCROLL FOR NEXT