जीएसटी, आयकरातील बदलांवर रविवारी मार्गदर्शन
----
नांदेड, ता. १४ : आयकर आणि वस्तू व सेवा करातील (जीएसटी) बदलांची माहिती देणाऱ्या २९ व्या ॲड.स्व. बन्सीलाल काबरा आयकर-विक्रीकर व्याख्यानमालेचे रविवारी (ता. १८) आयोजन केले आहे. हॉटेल चंद्रलोक येथे सकाळी साडेनऊला व्याख्यानमालेचे उद्घाटन महाराष्ट्र मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय कदम यांच्या हस्ते होईल. ज्येष्ठ फिजिशियन डॉ. पुरुषोत्तम डाड कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहतील.
ज्येष्ठ कर सल्लागार दिवंगत बन्सीलाल काबरा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी ही व्याख्यानमाला घेतली जाते. आयकर, विक्रीकर आणि करप्रणालीतील बदलांविषयी सामान्य नागरिक, व्यावसायिक, कर सल्लागारांना उपयुक्त माहिती मिळावी, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. यंदा जीएसटी आणि आयकर क्षेत्रातील महत्त्वाच्या बदलांवर मार्गदर्शन होणार आहे. नागपूर येथील जीएसटीतज्ज्ञ प्रीतम बत्रा हे ‘जीएसटीमधील मुख्य बदल’, तर नांदेडचे ॲड. बालाजी राजे हे ‘आयकरातील बदल’ या विषयांवर व्याख्यान देणार आहेत. या कार्यक्रमात सीए किशन माठोरे, सीए शंकर गुंडलवार यांच्या दीर्घकालीन सेवेबद्दल त्यांचा सत्कार करणार आहे. डीटीएल अभ्यासक्रमातील गुणवंत विद्यार्थ्यांचाही सन्मान केला जाणार आहे. व्याख्यानमालेस उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजक ॲड.सी.बी. दागडिया, ॲड. जयप्रकाश काबरा, सीए प्रवीण पाटील, गंगाबिशन कांकर, विजय मालपानी, ओमप्रकाश पोकर्णा, वसंत मैया, सीए जयप्रकाश फलोर, अलीभाई पंजवानी, शंभूभाई भानू, पी.एच. गट्टानी, गोविंद मुंदडा, हर्षद शहा, रामचंद्र रंगनानी, कृष्णा शेवडीकर, कमल कोठारी, मनोहर आयलाने, ॲड. अनिल जोशी, रवींद्रसिंह मोदी, प्रशांत काबरा, प्रतीक काबरा यांनी केले आहे.
----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.