gudi padwa sakal
छत्रपती संभाजीनगर

Gudi padwa 2023 : कोट्यवधींच्या उलाढालीची बाजारपेठेनेही उभारली गुढी!

तीनशे घरांचे बुकिंग, पाचशे कार अन् बाराशे दुचाकी उतरणार रस्त्यावर

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्यापासून मराठी नववर्षाला सुरुवात होते. नवीन वर्षातील हा पहिलाच सण असल्याने या दिवशी सोने खरेदी, वाहन खरेदी, वास्तू प्रवेश करण्याची परंपरा असल्याने शहरात त्याची लगबग सुरू आहे. गुढीपाडव्याला सोने,

चांदीचे दागिने खरेदी करणे, वाहन, गृह खरेदी, इलेक्ट्रॉनिक साहित्य खरेदी करणे शुभ मानले जाते. या शुभमुहूर्तासाठी शहरात पाचशे चारचाकी आणि बाराशे दुचाकींची बुकिंग झाली असल्याचे वितरकांनी सांगितले. तर तीनशे घरांचे देखील बुकिंग झाले आहे.

बुधवार (ता.२२) गुढीपाडवा असल्याने त्याच दिवशी सोन्याचे दागिने खरेदी केले जातात. यासाठी सराफा बाजारात अनेकांना दागिने बुक केले आहेत. काही जणांनी जुने दागिने मोडून नवीन दागिने केले आहेत. यामध्ये नेकलेस, गंठण, पाटल्या, ब्रासलेट, अंगठी, कर्णफुले यासह कलाकुसरीच्या दागिन्यांचा समावेश आहे. काही जणांनी चांदीचे दागिने तयार करण्यासाठी ऑर्डर दिल्या आहेत.

या शुभ दिवशी गृहप्रवेश, सोन्यासह नवीन वस्तू खरेदीला विशेष महत्त्व असते. या शुभमुहूर्तावर विविध वस्तू खरेदीला मोठी पसंती दिली जाते. त्यामुळे या दिवशी बाजारपेठेत कोट्यवधीची उलाढाल होते. लग्नसराई आणि पाडव्यानिमित्त रेडिमेड कपडा मार्केट, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, सराफा बाजारात ग्राहकांच्या पसंतीचा विचार करून व्यापाऱ्यांनी लाखोच्या नवीन वस्तू विक्रीसाठी आणल्या आहेत.

घर, गाड्या सर्वाधिक

गुढीपाडव्याच्या मुहूर्तासाठी सुमारे पाचशे चारचाकींची बुकिंग झालेली आहे. तर एक हजार ते बाराशे दुचाकींची बुकिंग आहे. या मुहूर्तावर ८०० चारचाकी आणि सुमारे २ हजार दुचाकी रस्त्यावरील उतरतील, अशी माहिती ऑटोमोबाईल असोसिएशनतर्फे देण्यात आली. स्वत:च्या हक्काच्या घराचे स्वप्न बघणारे बहुतांश जण शुभमुहूर्तावरच घर खरेदीला प्राधान्य देतात. पाडव्याच्या मुहूर्तासाठी शहरात तीनशे घरांचे बुकिंग पूर्ण झालेले आहे. यात आणखी दोनशे बुकिंग वाढून पाचशे गृहप्रवेश होण्याचा अंदाज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yunus Shaikh: कैसे हराया... फेम सहर शेखच्या वडिलांना शिंदेसेनेत मानाचं पान, युनूस खान यांची महत्त्वाच्या पदावर नियुक्ती

IND vs NZ ODI Squad : निवड समितीच्या डोक्यात काय शिजतंय? जसप्रीत बुमराहचा वन डे संघात समावेश अनिश्चित, दुखापत की आणखी काही कारण? Inside Story

ऐन दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांचा संप, बैठकीनंतरही अंमलबजावणी केली नाहीय; पडळकरांचा शिंदेंच्या मंत्र्यावर निशाणा

Latest Marathi News Update : “साहेब, ५ हजार रुपयांत काय होणार? शेतकऱ्याचं दुःख एकदा बांधावर येऊन समजून घ्या!”; हर्षवर्धन सपकाळ यांचे ट्विट

Pune Leopard News: सिंहगडाच्या पश्चिमेकडे बिबट्याची दहशत; तासाभरात तीन दुचाकीस्वारांवर हल्ले, युवती जखमी

SCROLL FOR NEXT