छत्रपती संभाजीनगर

गोकुंदा: शुभम शिंदे

CD
कारवाई थंडावताच गुटख्याची पुन्हा विक्री? ----- ‘व्यसनमुक्त किनवट’च्या घोषणेची अंमलबजावणी कुठे? नागरिकांचा सवाल ----- गोकुंदा, ता.४ : किनवटमध्ये काही दिवसांपूर्वी सुरू झालेल्या धडक कारवाईनंतर पुन्हा मावा आणि गुटख्याची विक्री सुरू झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे ‘व्यसनमुक्त किनवट’च्या घोषणेची अंमलबजावणी नेमकी कुठे? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रशेखर कदम यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पत्रकार परिषदेत शहरातील खर्रा, गुटखा, अवैध दारू, मटका आणि जुगारासह विविध अवैध धंद्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे जाहीर केले होते. अवैध धंद्यांबाबत माहिती देणाऱ्यांची नावे गोपनीय ठेवून योग्य ते बक्षीस देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले होते. यानंतर पोलिसांकडून विविध ठिकाणी कारवाया केल्या. खर्रा निर्मितीच्या ठिकाणांसह गुटख्याच्या साठ्यांवर छापे टाकून जप्तीची कारवाई केली. या कारवाईमुळे अनेक पानटपऱ्यांनाही कुलूप लागले होते. त्यामुळे नागरिकांनी पोलिसांच्या कारवाईचे स्वागत केले होते. मात्र, कारवाईनंतर काही दिवसांनी परिस्थिती पुन्हा पूर्वपदावर येत असल्याचा दावा नागरिकांकडून करण्यात येत आहे. ----- दहा रुपयांचा मावा आता २० ते ३० रुपयांवर? कारवाईपूर्वी दहा रुपयांना मिळणारा मावा आता २० ते ३० रुपयांपर्यंत विकला जात असल्याचे काही नागरिकांचे म्हणणे आहे. पूर्वी लपूनछपून होणारी विक्री आता काही ठिकाणी उघडपणे होत असल्याचेही नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे कारवाईनंतर मावा विक्री पूर्णपणे थांबण्याऐवजी त्याचे दर वाढल्याची चर्चा होत आहे. ---- कारवाई सातत्याने होणार का? कारवाई सुरू झाल्यानंतर काही काळ शहरातील अवैध तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीला आळा बसल्याचे चित्र होते. मात्र, आता पुन्हा अशी विक्री होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे असेल तर त्यामागील कारणांचा शोध घेण्याची गरज आहे. ‘व्यसनमुक्त किनवट’साठी करण्यात आलेल्या घोषणेची अंमलबजावणी केवळ काही दिवसांच्या कारवाईपुरती मर्यादित न राहता सातत्याने होणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

IND vs NZ: प्रयोग थांबणार अन् न्यूझीलंडविरुद्धच दिसणार भारताची World Cup ची संभावित प्लेइंग-११? कर्णधार शुभमन गिलचे संकेत

France Student Protests : फ्रान्समधील विद्यार्थी आंदोलनाला हिंसक वळण; ४ हजार जणांना अटक, २०० जण जखमी

विद्युत खांबावरील स्पार्किंगमुळे आग; ४ एकर ऊस, सोलार व ठिबकचे साहित्य जळून खाक, शेतकरी उद्ध्वस्त

Irani Cup 2026: रिषभ पंतच्या नेतृत्वातील संघ ठरला चॅम्पियन! फायनलमध्ये रणजी ट्रॉफी विजेत्यांना केलं पराभूत

भाकरीसोबत तोंडाला पाणी आणणारी गोळ्याची आमटी; पाहा खानदेशी पद्धतीची रेसिपी; GOLYACHI AAMTI RECIPE

SCROLL FOR NEXT