Hailstorm In Aurangabad esakal
छत्रपती संभाजीनगर

Hailstorm In Marathwada | औरंगाबाद, जालना, हिंगोली जिल्ह्यात गारपीट

गव्हाचे पीक आडवे, शेतकऱ्यांना फटका

सकाळ टीम

औरंगाबाद : औरंगाबाद, हिंगोली आणि जालना (Jalna) जिल्ह्यात मंगळवारी (ता.२८) दुपारी जोरदार पाऊस झाला. दरम्यान, गारपीटही (Hailstorm) झाली. त्यामुळे रब्बीच्या पिकांचे नुकसान झाले. गव्हाचे पीक आडवे झाले. परिणामी, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. भोकरदन (Bhokardan) तालुक्यातील वालसावंगी येथे दुपारी जोरदार पाऊस झाला. या पावसादरम्यान गाराही पडल्या. पिंपळगाव रेणुकाई येथे रिमझिम पाऊस (Hailstrom In Marathwada) झाल्याने आठवडे बाजारातील भाजीपाला विक्रेत्यांसह ग्रामस्थांसह तारांबळ उडाली. पारध, अंबड (Ambad) शहरासह तालुक्यातील रोहिलागड, जामखेड, सुखापुरी येथेही पावसाने हजेरी लावली. दरम्यान, जालना(Jalna) शहरासह जिल्ह्यात मंगळवारी ढगाळ वातावरण होते. (Hailstorm In Aurangabad, Jalna And Hingoli District)

वडीगोद्री भागातील दुनगाव, टाका, डोणगाव येथे वादळी वारे, गारांसह जोरदार पाऊस झाला. शेलूद (ता.भोकरदन) येथील शेतकरी शिवाजी भीमराव बारोटे यांच्या बैलावर वीज पडली. त्यात बैल दगावला. औरंगाबाद (Aurangabad) शहरात ढगाळ वातावरण होते. वैजापूर, कन्नड, गंगापूर आणि पैठण तालुक्यातील काही गावांमध्ये जोरदार गारांचा पाऊस झाला. रहिमाबाद परिसरात मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला.

पाचोडसह परिसरात गारपीट झाली. शेंदुरवादा, माणिकनगर, बालानगर, ढोरकीन, कायगाव आणि जायकवाडी येथेही विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. पिशोर येथे पावसामुळे आठवडे बाजारासाठी आलेल्यांची तारांबळ उडाली. गारपिटीमुळे हवेत गारवा निर्माण झाला असून, थंडी तीव्रता वाढली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Saif Ali Khan : सैफ अली खानला मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिला मोठा धक्का!

Latest Maharashtra News Updates : आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना लगावला टोला, म्हणाले...

SCROLL FOR NEXT