3Admission_4 
छत्रपती संभाजीनगर

अर्धे सत्र संपले तरी अकरावी प्रवेशाची प्रतीक्षा; विद्यार्थी, पालक अन् शिक्षकांची वाढली चिंता

संदीप लांडगे

औरंगाबाद : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शासनाने ऑनलाइन शिक्षणावर भर दिला. मात्र, आरक्षणामुळे अकरावीची प्रवेशप्रक्रिया रखडल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. अकरावीचे पहिले सत्र संपले तरी प्रवेशप्रक्रिया सुरू झालेली नाही. त्यामुळे पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांची चिंता वाढली आहे.


यंदा कोरोनामुळे दहावी, बारावीचा निकाल लावण्यास उशीर झाला. त्यानंतर अकरावीची प्रवेशप्रक्रियाही उशिरा सुरू झाली. अकरावी ऑनलाइन प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादीतील प्रवेश पूर्ण झाल्यानंतर मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. परिणामी, अकरावी प्रवेशप्रक्रिया रखडली. अकरावीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासंदर्भात शिक्षण विभागाने अद्याप कोणताच निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे अकरावीचे विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत.

प्रवेश घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना अकरावीच्या परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. मात्र, ज्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अद्याप झालेले नाहीत, त्यांना प्रवेशाची चिंता लागली आहे. औरंगाबादेत अकरावी प्रवेशासाठी एकूण ११६ महाविद्यालये असून त्यांची प्रवेश क्षमता ३१ हजार ४६५ आहे. त्यापैकी अर्जाचा भाग एक १९ हजार ५४३ विद्यार्थ्यांनी भरला असून, पडताळणी १९ हजार ३५९ विद्यार्थ्यांनी केली आहे. अर्जाचा भाग दोन १६ हजार ४०४ विद्यार्थ्यांनी भरला.

पहिल्या फेरीसाठी आठ हजार ७४० विद्यार्थ्यांपैकी सहा हजार शंभर विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले. कोटा प्रवेशात एक हजार ७८२ प्रवेश घेतले. दुसऱ्या फेरीसाठी दोन हजार ८६० विद्यार्थी पात्र ठरले. परंतु, एसईबीसीच्या निर्णयामुळे पुढील प्रक्रिया सध्या स्थगित झाली आहे. प्रवेशप्रक्रिया ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते; पण आता पंधरा दिवस होऊन गेले तरी याबाबत काहीच निर्णय झालेला नाही. ज्यांचे प्रवेश झालेत ते विद्यार्थी त्यांचे क्लास कधी सुरू होणार याची वाट पाहत आहेत. शिक्षण विभागाने अकरावीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी कोणतेच नियोजन केले नाही.

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Munde: धनंजय मुंडेंचा रोख कुणाकडे? ''राज्यातील बड्या नेत्यांचं मला संपवायचं कारस्थान...''

IPL 2026 Marathi News: वैभव सूर्यवंशीला आयपीएल सुरू होण्यापूर्वी कॅप्टन रियान परागचा सल्ला; म्हणाला, त्यांच्यापासून दूर राहा...

Dombivli: डोंबिवलीत २८वी स्वागतयात्रा; संस्कृती आणि राष्ट्रभावनेचा भव्य संगम, यंदा काय खास ठरलं? जाणून घ्या...

Viral Video : ही तर साक्षात देवीच! निरागस डोळे अन् मोहक हास्य; अवघ्या 3 महिन्यांच्या चिमुकलीचं हे रूप पाहून तुम्हीही भारावून जाल, व्हायरल व्हिडिओने जिंकली लाखो हृदय

Junnar News : जुन्नरमध्ये डॉक्टरकडे खंडणीची मागणी; बेकायदेशीर बांधकामाचा धाक दाखवत ३५ लाखांची मागणी

SCROLL FOR NEXT