Chh. Sambhajinagar  Sakal Digital
छत्रपती संभाजीनगर

Chh. Sambhajinagar News : फोन करून महिलांची छेड काढणे भोवले

तिघांविरुद्ध गुन्हा : पैठण तालुक्यातील मुरमा येथील घटना

सकाळ वृत्तसेवा

पाचोड : महिलांचे संपर्क क्रमांक मिळवून त्यांच्याशी अश्लील संभाषण करून छेड काढणाऱ्या तरुणासह त्याच्या कुटुंबातील तिघांविरुद्ध पाचोड (ता.पैठण) पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मुरमा (ता.पैठण) येथे शनिवारी घडली.

मुरमा येथील ज्ञानेश्वर बाबासाहेब मगरे (वय २९) हा तरुण महिलांचे मोबाईल नंबर उपलब्ध करून त्यांना कॉल करून अश्लील संभाषण करून छेड काढत होता. सदरील मोबाईल नंबरवर संपर्क साधल्यास तो बंद करून ठेवत असल्याने गेल्या महिनाभरापासून त्याचा सर्वत्र शोध घेतला जात होता.

त्याने शनिवारी (ता.२) गावातील महिलेस व्हिडिओ कॉल करून त्याची छेड काढली. त्याचा नंबर व वर्णनावरून त्याचा शोध घेतला असता तो सापडून आला. त्यास गावातील युवकांनी चोप देताच आपण करीत असलेल्या कृत्याची कबुली दिली. याप्रकरणी एका महिलेने पाचोड पोलिस ठाणे गाठल्याचे समजताच तो पसार झाला.

तर काही युवकांनी त्याच्या घरी जाऊन कुटुंबीयांना घडला प्रकार सांगण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी समजाविण्यास आलेल्या लोकांवर गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. त्यामुळे नागरिकांनी पाचोड ठाणे गाठून संबंधितावर कारवाईची मागणी केली. महिलेच्या तक्रारीवरून ज्ञानेश्वर मगरे, वडील बाबासाहेब मगरे, भाऊ कृष्णा मगरे विरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास पाचोड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुरेश माळी व गोविंद राऊत हे करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VHP Garba Ban : गरब्यात मुस्लिमांना बंदी घालण्याच्या विश्व हिंदू परिषदेच्या मागणीला केंद्रीय मंत्र्यांचा विरोध; संविधानाचा दिला दाखला

'बोक्या सातबंडे' चित्रपटात पेपर विकणाऱ्या अभिनेत्याला ओळखलंत का? आज मराठीसोबतच बॉलिवूडही गाजवतोय, कोण आहे हा?

Marathi News Live Updates : काँग्रेस नेते दिग्विजय सिंह उज्जैन ते अयोध्या पदयात्रा काढणार

Nanded News : नवसंशोधनाला मिळणार नांदेडची प्रयोगभूमी; ग्रामीण टेक्निकल कॅम्पसकडे ‘आविष्कार २०२६’ची धुरा!

Ambad News : तलावात खांदेमळणीला गाय, बैल धूण्यासाठी गेलेल्या 17 वर्षीय सौरभ नरोडेचा पाण्यात बुडून मृत्यू; धनगरपिंपरीसह परिसरात हळहळ व्यक्त

SCROLL FOR NEXT