Harassment of entrepreneurs givers Land mafia blackmailers taken Action Commissioner of Police sakal
छत्रपती संभाजीनगर

उद्योजकांना त्रास देणाऱ्यांवर होणार कारवाई - पोलिस आयुक्त

भूमाफिया, ब्लॅकमेलर्स आता रडारवर

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : शहरात जमीन मालकाला अंधारात ठेवून त्याची जमीन परस्पर विक्री करणे, एखाद्या जागेवर कब्जा घेऊन मालकांला धमकावित असल्याच्या काही घटना समोर आलेल्या आहेत. या घटनेनंतर दुसऱ्या जमीनीवर कब्जा करणाऱ्या तसेच दहशत निर्माण करून जमीन बळकाविणाऱ्या भुमाफियांच्या विरोधात कारवाई सुरू करण्यात येणार आहे.

दोन पेक्षा अधिक प्रकरणात एकाच व्यक्तीचे नाव आल्यास त्याच्या विरोधात एमडीए (झोपडपट्टी कायदा) कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी दिली.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेनंतर गेल्या काही वर्षात अनेक जणांच्या घरांवर शहरातील भुमाफियांनी कब्जे केले असल्याच्या काही तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. एका प्रकरणात जिवंत असलेल्या एका व्यक्तीला मृत दाखवून त्याची जमीन बळकाविल्याच्या घटना समोर आलेल्या आहेत. असे प्रकरणे सध्या जास्त समोर येत आहेत. अशा प्रकरणानंतर भुमाफियांच्या विरोधात पोलिसांची विशेष कारवाई केली जाणार असल्याचे संकेत त्यांनी दिले.

मुद्रांक शुल्कच्या अधिकाऱ्यांची बैठक

भूमाफियांच्या तसेच ब्लॉकमेलर्सला आळा घालण्याच्या प्रकरणात मुद्रांक शुल्क व नोंदणी कार्यालयाच्या अधिकारी व कर्मचारी यांचीही बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत या कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरही दबाव आणला जात असेल तर अशांविरोधात कारवाईसंदर्भाने माहिती घेण्यात येणार आहे.

नागरिकांनो तक्रारीसाठी पुढे या

पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत सर्वसामान्यांच्या जागेवर भुमाफिया तसेच ब्लॅक मेलर्स कब्जा करून ठेवत आहेत. अशा भुमाफिया आणि ब्लॅकमेलर्सच्या अन्याय झालेल्या नागरिकांनी पुढे येऊन पोलिस विभागाकडे पुराव्यांसह तक्रार देण्याचे आवानही आयुक्तांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT