Kalyan Kale And Haribhau Bagade  esakal
छत्रपती संभाजीनगर

सहकारात या! जरुर आशीर्वाद देऊ, हरिभाऊ बागडेंचा कल्याण काळेंना टोला

'मला वाटते तुम्हाला कधी सहकारात उभा राहता येणार नाही.'

सकाळ डिजिटल टीम

औरंगाबाद : सहकारात या ! जरुर आशीर्वाद देऊ, असा टोला माजी विधानसभा अध्यक्ष तथा आमदार हरिभाऊ बागडे यांनी काँग्रेस नेते कल्याण काळे (Kalyan Kale) यांना लगावला आहे. आज रविवारी (ता.२३) औरंगाबाद (Aurangabad) जिल्हा दुध संघाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. याचा आम्ही एकमेकांचे शत्रू आहोत असे नाही. सहकार सर्वांचा असतो, असे म्हणताच कल्याण काळे यांनी नाना आता सहकार अर्धाच मिळाला, असे बागडे यांना उद्देशून म्हणाले. मला वाटते तुम्हाला कधी सहकारात उभा राहता येणार नाही, असा उपरोधक टोला बागडे यांनी काळे यांना लगावला. (Haribhau Bagade Criticize Kalyan Kale Over Cooperative Sector In Aurangabad)

तुटेल इथपर्यंत ताणायला नको. कार्यकर्ते पदाधिकारी यांचे आभार. या संघाची आणखीन झालेली भरभराट पाहायला मिळेल, असा आशावाद हरिभाऊ बागडे (Haribhau Bagade) यांनी यावेळी व्यक्त केला. औरंगाबाद जिल्हा दुध संघासाठी शनिवारी (ता.२२) मतदान झाले. त्याचा निकाल आज जाहीर झाला. यात भाजप-शिवसेनेने युती करुन दुध संघाची सत्ता आपल्याकडे राखली आहे. यावेळी महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, कल्याण काळे यांच्यासह विजयी पदाधिकारी उपस्थित होते.(Aurangabad District Milk Federation Election 2022)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

SCROLL FOR NEXT