छत्रपती संभाजीनगर

हर्सूल येथील चेतनानगरी स्मशानभूमीत सुविधांचा वानवा

CD
हर्सूलच्या चेतनानगरी स्मशानभूमीत सुविधांचा अभाव अपुरी शेड, पाणी आणि पथदिव्यांची समस्या; सुरक्षा भिंतही कोसळली हर्सूल, ता. १७ : हर्सूल येथील चेतनानगरी स्मशानभूमी मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याने अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. अपुरी शेड, पाण्याची व्यवस्था नसणे, पथदिव्यांचा अभाव आणि कोसळलेली सुरक्षा भिंत यांसह विविध समस्यांकडे महापालिकेचे लक्ष वेधण्यासाठी नागरिकांनी निवेदन दिले आहे. स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी एकच लहान शेड असून त्यात लोखंडी पिंजऱ्यांची व्यवस्था नाही. एकाच वेळी दोन अंत्यविधी आल्यास अडचण निर्माण होते. नातेवाइकांसाठी बैठक व्यवस्था नसल्याने पावसाळ्यात भिजत थांबावे लागते. पाण्याची सोय नसल्याने अंत्यविधीसाठीचे पाणी अर्धा किलोमीटर अंतरावरील समाजमंदिरातून आणावे लागते. असे रंगनाथ वाघुळे, भगवान वाघुळे, निवृत्ती वाघुळे, कैलास वाघुळे, दादाराव वाघुळे, सांडू वाघुळे, सुनील वाघुळे, अशोक वाघुळे, सारंग वाघुळे, श्यामलाल गायकवाड, शांतिलाल तुपे, सुरेश तुपे, बंटी पवार यांच्यासह स्थानिक नागरिकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. रात्री अंधार, परिसरात दुर्गंधी पथदिवे नसल्याने रात्री अंत्यविधी करताना अडचणी येतात. स्मशानभूमीची २५ ते ३० फूट सुरक्षा भिंत कोसळली असून, लोखंडी ताराही तोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे परिसरात कचरा टाकला जात असून, दुर्गंधीचा त्रास होत आहे. या आहेत मागण्या स्मशानभूमीत नवीन शेड, लोखंडी पिंजरे, बैठक व्यवस्था, बोअरवेल किंवा नळजोडणी आणि पथदिवे बसवावेत. सुरक्षा भिंतीची पुनर्बांधणी करून उंची वाढवावी. कायमस्वरूपी स्मशानजोगी नेमून त्यांच्या निवासासाठी व साहित्य ठेवण्यासाठी लॉकर रूम बांधावी. प्रवेशद्वारापासून शेडपर्यंत आणि मोकळ्या जागेत गट्टू बसवावेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL मधील निवृत्तीनंतर शेअर बाजारात एन्ट्री; धोनीची गुंतवणूक असलेल्या कंपनीचा लवकरच येणार IPO

Cabinet Decision: शिक्षण क्षेत्रापासून न्यायालयापर्यंत, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ धडाकेबाज निर्णय

Gurnoor Brar: भारताच्या गुरनूर ब्रारला ICC कडून मोठी शिक्षा! वनडेतील भांडण पडलं महागात

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्रीनं दिली गुडन्यूज! व्हिडिओ शेअर करत म्हणाली...

Latest Marathi News Live Update : गिरीश महाजन संकटमोचक, पण लय लफडेबाज; गुलाबराव पाटलांची फटकेबाजी

SCROLL FOR NEXT