छत्रपती संभाजीनगर

अकरावर्षीय मुलाची ओळख पटेना; पाच जखमींवर उपचार सुरू

CD
ABD26J78878 हट्टा ः अपघातानंतर ऑटोरिक्षाची झालेली अवस्था. ------ अपघातात मायलेकीसह चौघांचा मृत्यू, ५ जखमी ----- वसमत तालुक्यात रिक्षाला धडक -- हट्टा (जि. हिंगोली), ता. ७ : भरधाव वाहनाने रिक्षाला धडक दिल्याने मायलेकीसह चौघांचा मृत्यू, तर पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना कळंबा (ता. वसमत) पाटीजवळ सोमवारी (ता. सात) दुपारी घडली. औंढा नागनाथ येथून प्रवाशांना घेऊन रिक्षा (एमएच २२ एपी २१४९) परभणीच्या दिशेने निघाली होती. कळंबा पाटीजवळ भरधाव वाहनाने धडक दिल्याने रिक्षा रस्त्याखाली जाऊन उलटली. ग्रामस्थांनी जखमींना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. या अपघातात अद्विका संदीप साळवे (वय दीड वर्ष) व एका अकरावर्षीय मुलाचा मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह हट्टा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. त्यानंतर इतर जखमींना परभणी येथे दाखल केल्यानंतर प्रज्ञा संदीप साळवे (वय ३०, रा. औंढा नागनाथ) व अर्चना संभाजी थोरात (वय ३५, रा. गुरूपिंपरी, ता. घनसावंगी, जि. जालना) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सुरेश दत्तराव जाधव (रा. जोडजवळा, ता. वसमत), रेखा रणखांबे, ओंकार रणखांबे, समीरखान, साई संभाजी थोरात हे गंभीर जखमी आहेत. हट्टा पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक संदीप बोरकर, उपनिरीक्षक संजय केंद्रे यांनी घटनास्थळी भेट दिली. ११ वर्षीय मुलाची ओळख पटलेली नव्हती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाचे 5 मोठे अपडेट्स! केंद्रीय कर्मचारी-पेन्शनधारकांसाठी काय महत्त्वाचं?

Vishwajeet Kadam Warning to Government : सांगलीला पाणी द्या! "कोणी आडवं आलं तर गाठ माझ्याशी!"; विश्वजीत कदमांचा मंत्री शंभूराज देसाईंना थेट इशारा!

टोरंट प्रकल्पाविरोधात शिवसेनेचा एल्गार! कर्जतच्या जंगलातील वृक्षतोडीवरून आक्रमक भूमिका; सत्ताधाऱ्यांना घेरले

SHUKRA UDAY 2026 ASTRO PREDICTIONS: नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच ‘या’ ३ राशींचं नशीब चमकणार? शुक्राच्या उदयाने धनलाभासह करिअरमध्येही येणार प्रगतीचे योग!

Maharashtra Live News: बंद कार्डधारकाचा माल पूर्ववत करण्यासाठी काँग्रेसचे धरणे

SCROLL FOR NEXT