कोविशिल्ड लस
कोविशिल्ड लस 
छत्रपती संभाजीनगर

आरोग्य सेवकाकडून कोरोना लसीचा काळाबाजार,वाळूज परिसरातील प्रकार

रामराव भराड

वाळूज (जि.औरंगाबाद) : शासनाकडून मोफत दिली जाणारी कोरोनाची लस खुद्द आरोग्य सेवकच चोरायचा आणि तिचा काळाबाजार (Corona Vaccine's black marketing) करीत एका डोससाठी तब्बल ३०० रुपये वसूल करायचा! त्याचा हा गोरखधंदा वाळूज (Waluj) परिसरातील साजापूर येथे सोमवारी (ता.नऊ) युवा सेनेमुळे (Yuva Sena) उघडकीस आणला. पोलिसांनी संशयित आरोपीला मुद्देमालासह गजाआड केले आहे. कोरोनावर सध्या तरी लसीकरणाशिवाय कोणताच पर्याय नाही. त्यामुळे प्रत्येकाची ओढ लस घेण्याकडे आहे. सरकार दप्तरी व खासगी कंपन्यांमध्ये (Aurangabad) लस न घेतलेल्यांना प्रवेश दिला जात नसल्यानेही कामगार-कर्मचारी लस घेण्यासाठी आपापल्या परीने प्रयत्न करीत असतात. सरकारच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्रे (Primary Health Centre), उपकेंद्रे व जिल्हा परिषद शाळेत ही लस मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. आधीच लशींचा तुटवडा आहे. त्यामुळे दररोज ५० किंवा १०० डोसच एका केंद्रावर दिले जातात. त्यामुळे या केंद्राबाहेर लांबच लांब रांगा लागतात. परिणामी चेंगराचेंगरी होऊन जखमी होण्याचेही प्रकार घडत आले आहेत.

शिवाय लस मिळेलच याची शक्यता नसल्याने अनेक जण खासगी किंवा काळ्या बाजारातून लस घेण्याचे प्रयत्न करीत आहेत. याचाच फायदा घेऊन वाळूजच्या प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या रांजणगाव (शेणपुंजी) येथील प्राथमिक उपकेंद्रातील आरोग्य सेवक गणेश रामदास दुरोळे याने शक्कल लढवली. तो सरकारी डोसची काळ्या बाजारात विक्री करीत असे. याची कुणकुण रांजणगाव (शेणपुंजी) येथील युवा सेनेचे निखील कोळेकर यांना लागताच त्यांनी हा प्रकार उघडकीस आणला. रांजणगाव येथील प्राथमिक उपकेंद्रातून तो लस चोरी करत असल्याचा संशय असून या लसीचे डोस वाळूज परिसरातील साजापूर येथे एका दहा बाय दहाच्या खोलीत ३०० रुपये घेऊन देत होता. लस देण्यासाठी गणेश हा प्रथम आधार कार्ड घेऊन त्याचे ऑनलाइन नोंदणी करीत असे. ज्याची नोंदणी झाली त्याच्याकडून तीनशे रुपये घेऊन त्याला लस देत असे. हा प्रकार उघडकीस येताच वाळूज एमआयडीसी पोलिसांनी साजापूर येथे छापा टाकून आरोपी गणेश दुरोळे यास अटक करून त्याच्या ताब्यातून दहा जणांना दिलेले लसीचे डोस व भरलेल्या तीन बाटल्या जप्त केल्या. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, या प्रकरणात लसींचा काळाबाजार करणाऱ्यांचे रॅकेट असण्याची शक्यताही व्यक्त होत आहे.

सय्यद अमजदवरही संशय

लसीचे डोस जिकठाण प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवक सय्यद अमजद याच्याकडून घेतल्याचे आरोपी गणेश दुरोळे हा सांगत असल्याने सय्यद अमजद याच्यावरही संशय व्यक्त करण्यात येत आहे.

रांगेत उभे राहूनही लस नाही

वाळूज औद्योगिक वसाहतीतील प्रत्येक कंपनीत कामगारांना कोरोनाची लस अत्यावश्यक केलेली आहे. त्यामुळे अनेक जण ही लस घेण्यासाठी सरकारी लसीकरणाच्या ठिकाणी रांगा लावतात. मात्र तरीही लस मिळत नसल्याने कामगार काळ्या बाजारातील तीनशे रुपये किमतीची लस घेण्यास तयार होत होते.

असे करायचे गैरप्रकार

आरोपी गणेश दुरोळे व सय्यद अमजद हे दोघेही रांजणगाव (शेणपुंजी) येथील आरोग्य उपकेंद्रात आरोग्य सेवक म्हणून काम करतात. मात्र आरोग्य सहाय्यक अरविंद घोरपडे हे सेवानिवृत्त झाल्याने सय्यद अमजद याच्याकडे अतिरिक्त म्हणून आरोग्य सहाय्यकचा चार्ज आहे. त्यामुळे सय्यद अमजत हा जिकठाण येथून कोणत्या केंद्रावर किती डोस येणार याची माहिती संबंधित आरोग्य उपकेंद्रावरील कर्मचाऱ्यांना देत होता. तर आरोपी गणेश दुरोळे हा या उपकेंद्रावर लस पुरवठा करत होता. दरम्यान याबाबत आरोग्य अधिकारी डॉ. विवेक कांबळे यांच्याशी वारंवार संपर्क करूनही त्यांनी काहीच प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे अधिक माहिती मिळू शकली नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi on Pune Porsche Accident: पुणे पोर्शे दुर्घटनेवरून राहुल गांधींनी PM मोदींवर सोडलं टीकास्त्र, म्हणाले 'दोन भारत...'

KKR vs SRH Qualifier 1 Live : त्रिपाठी बाद झाला अन् हैदराबादची गळती झाली सुरू

अबबऽऽऽ चक्क मिळाले 100 टक्के गुण! बुद्धिबळ खेळणाऱ्या तनिषाने 100 टक्के गुण मिळवत जिंकला 'बारावी'चा डाव

Nashik Accident News: इगतपुरीच्या भावली धरणात ५ जणांचा बुडून मृत्यू; मृतांमध्ये तीन मुली व दोन मुलांचा समावेश

IPL Qualifier 1: मिचेल स्टार्कची 24 कोटी वसूल करणारी कामगिरी! हेडचा त्रिफळा उडवलाच, पण KKR ला दिली स्वप्नवत सुरुवात

SCROLL FOR NEXT