छत्रपती संभाजीनगर

डॉ. प्रवीण सूर्यवंशी : सकाळ संवाद दिवाळी अंक

CD
आरोग्य ही चैन नव्हे, तर मूलभूत गरज ः डॉ. प्रवीण सूर्यवंशी ---- डॉ. प्रवीण सूर्यवंशी हे मूळचे पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथील आहेत. त्यांचे चौथीपर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद शाळेत मराठी माध्यमातून झाले. पुढे प्रवरानगर येथून एमबीबीएस आणि बॉम्बे हॉस्पिटलमधून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. दक्षिण कोरियात जाऊन त्यांनी लिव्हर ट्रान्सप्लांट आणि विशेष शस्त्रक्रियांचे प्रगत प्रशिक्षण घेतले. वर्ष २००१ मध्ये त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथे आपल्या वैद्यकीय सेवेला सुरुवात केली. मराठवाड्यात अद्ययावत वैद्यकीय तंत्रज्ञान आणणे आणि रुग्णांना जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा पुरवणे हे त्यांचे मुख्य ध्येय असून त्यांचा हा प्रदीर्घ प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. आरोग्य क्षेत्रातील समस्या सोडवण्यासाठी केवळ निधी किंवा सुविधा पुरेशा नसून संपूर्ण समाजाची मानसिकता बदलणे गरजेचे आहे. अवयवदानासाठी नातेवाईक सकारात्मक असतात, मात्र ब्रेनडेड रुग्णांची वेळेत ओळख न पटल्याने अनेक अवयव वाया जातात. त्यासाठी शासकीय पातळीवर सक्षम यंत्रणा उभी राहणे आवश्यक आहे. याशिवाय, मेडिकल टुरिझमचा विकास, रोबोटिक सर्जरीचे भविष्यातील फायदे आणि उपचारांच्या वाढत्या खर्चामागील कारणे यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये संवेदनशीलता आणि नैतिकता असायलाच हवी, असा महत्त्वाचा संदेशही यात दिला आहे. ------ आरोग्य क्षेत्रातील समस्या केवळ निधी, तंत्रज्ञान किंवा पायाभूत सुविधांमुळे निर्माण होत नाहीत, तर त्या समाजाच्या मानसिकतेशीही निगडित असतात. नागरिक, डॉक्टर, प्रशासन आणि शासन या सर्वांनी आरोग्याबाबतची दृष्टी बदलली तरच दर्जेदार आरोग्यसेवा सर्वांपर्यंत पोचू शकते. आरोग्य ही चैनीची गोष्ट नाही, ती प्रत्येक नागरिकाची मूलभूत गरज आहे. मानसिकता बदलली तर आरोग्य व्यवस्थेतील निम्म्या समस्या आपोआप सुटतील, असे मत गॅस्ट्रोएंटेरोलॉजिस्ट, लॅप्रोस्कोपिक सर्जन आणि एमजीएमचे सीईओ डॉ. प्रवीण सूर्यवंशी यांनी व्यक्त केले. मेडिकल टुरिझम, रोबोटिक सर्जरी, वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य व्यवस्थेतील आव्हानांवर त्यांनी सविस्तर चर्चा केली. ते म्हणाले, अवयवदानाबाबत समाजात जागरूकता वाढली. पण, प्रत्यक्षात सर्वांत मोठे आव्हान म्हणजे ब्रेनडेड रुग्णांची वेळेत ओळख करणे आहे. अवयवदानास नातेवाइकांचा सकारात्मक प्रतिसाद असतो. मात्र, अपघातातील रुग्णांमध्ये ब्रेनडेड स्थिती वेळेत ओळखली नाही, तर अनेक अवयव वाया जातात. यासाठी ४८ तासांत सर्व प्रक्रिया पूर्ण करावी लागते. शासकीय रुग्णालयांतील डॉक्टरांचे प्रशिक्षण, स्वतंत्र कार्यपद्धती आणि सक्षम समन्वय यंत्रणा उभी करण्याची आवश्यकता आहे. त्या दृष्टीने उपाययोजना सुरू आहेत. शासन स्तरावरूनही यासाठी सक्षम यंत्रणा आणि एसओपी तयार व्हायला हव्यात. असे झाल्यास अवयवदानाचा टक्का वाढून प्रतीक्षा यादीवरील रुग्णांना जीवदान मिळू शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मेडिकल टुरिझमबाबत डॉ. सूर्यवंशी म्हणाले, परदेशी रुग्ण केवळ उपचारांसाठी येत नाहीत, तर त्यांना संपूर्ण सुविधा अपेक्षित असतात. विमानतळापासून रुग्णालयापर्यंतचा प्रवास, भाषांतर सुविधा, निवास व्यवस्था, सुरक्षित वातावरण आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची आरोग्यसेवा या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. एमजीएममध्ये ४०० खाटांचे नवीन सुपर स्पेशालिटी आणि कर्करोग रुग्णालय जॉइंट कमिशन इंटरनॅशनलच्या (जेसीआय) निकषांवर उभे राहत आहे. भविष्यात एमजीएम वैद्यकीय पर्यटनासाठी पूर्ण क्षमतेने कार्यरत असेल. त्याचे हे पहिले पाऊल आहे. एमजीएममध्ये सुरू झालेला एमसीएच हिपॅटो-पॅनक्रिएटो-बिलियरी सर्जरी अभ्यासक्रम हा देशातील चौथा आणि महाराष्ट्रातील पहिला ठरला. तंत्रज्ञानाचा वापर विवेकपूर्ण होणे गरजेचे आहे. प्रत्येक आधुनिक तंत्रज्ञान रुग्णांसाठी उपयुक्तच असेल असे नाही. काही शस्त्रक्रियांमध्ये पारंपरिक पद्धती आणि रोबोटिक तंत्रज्ञानाचे परिणाम सारखे आहेत. भविष्यात टेली सर्जरीमुळे जगातील कोणत्याही तज्ज्ञ डॉक्टराकडून दूरस्थ पद्धतीने शस्त्रक्रिया करणे शक्य होईल. तेव्हा या तंत्रज्ञानाचे खरे फायदे दिसून येतील. मात्र, सध्या हे तंत्रज्ञान खूप खर्चिक असल्याचेही ते म्हणाले. ----- मध्यस्थांमुळे उपचारावरील खर्च वाढला ‘विमा कंपन्या, कॉर्पोरेट व्यवस्था आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या वाढीव खर्चामुळे उपचार खर्च वाढत आहे. आज विमा कंपन्या रुग्णाला कोणता उपचार द्यावा, हे ठरवत आहेत. तीस वर्षांपूर्वी डॉक्टर आणि रुग्ण यांच्यात थेट संबंध होता. आता अनेक मध्यस्थ घटक निर्माण झाले. विमा, थर्ड-पार्टी ॲडमिनिस्ट्रेटर (टीपीए), कॉर्पोरेट हॉस्पिटल चेन आणि अतिरिक्त स्टेकहोल्डर्समुळे उपचार खर्च वाढत आहे. हे घटक रुग्णांप्रती थेट जबाबदार नाहीत. त्यामुळे डॉक्टरांनाच सर्व दोष दिला जातो. मात्र, त्यामागील सत्य रुग्णांनी जाणून घेतले पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले. ----- हवी संवेदनशीलता आणि नैतिकता जागा वाढवण्याच्या प्रयत्नांत वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या वाढवली जात आहे. मात्र, गुणवत्तापूर्ण शिक्षण, अनुभवी शिक्षक आणि सेवाभावाची मानसिकता कमी होत आहे. अमेरिकेतही डॉक्टरांची कमतरता आहे. मात्र, त्यांनी उठसूट वैद्यकीय महाविद्यालये उभारली नाहीत. डॉक्टर बनू शकतील अशी बुद्धिमत्ता मोजक्याच लोकांत असते. तशाच गुणवत्ताप्रधान व्यक्ती डॉक्टर व्हायला हव्यात. डॉक्टर होण्यासाठी केवळ गुण पुरेसे नसून संवेदनशीलता, नैतिकता आणि रुग्णांच्या वेदना समजून घेण्याची क्षमता आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. ----- राष्ट्रीय अध्यक्षपदापर्यंतचा २६ वर्षांचा प्रेरणादायी प्रवास आपल्या वैद्यकीय जीवन प्रवासाबद्दल सांगताना ते म्हणाले, पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथे मराठी माध्यमातून चौथीपर्यंत जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतले. प्रवरानगर येथून एमबीबीएस केले. बॉम्बे हॉस्पिटलमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले. दक्षिण कोरियात लिव्हर ट्रान्सप्लांट आणि हिपॅटो-पॅनक्रिएटो-बिलियरी सर्जरीचे प्रशिक्षण घेतले. वर्ष २००१ मध्ये छत्रपती संभाजीनगर येथे आल्यानंतर कर्करोगाचे लवकर निदान व्हावे, यासाठी एमजीएममध्ये एंडोस्कोपी सेवा सुरू केली. पुढे लॅप्रोस्कोपी तसेच लिव्हर आणि पॅनक्रियाज शस्त्रक्रियेचे प्रशिक्षण पुन्हा कोरियात जाऊन घेतले आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान मराठवाड्यात आणले. वर्ष २००७ मध्ये एमजीएममध्ये स्वतंत्र विभाग सुरू केला. दरम्यान, २०१७ मध्ये पुणे-मुंबईबाहेर महाराष्ट्रातील पहिले लिव्हर ट्रान्सप्लांट एमजीएममध्ये यशस्वी झाले. लाइव्ह सर्जरी आणि शस्त्रक्रिया क्षेत्रातील कार्याची दखल घेत २०१० मध्ये असोसिएशन ऑफ सर्जन्स ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र शाखेचा सर्वांत युवा अध्यक्ष झालो. पुढे वर्ष २०२५ मध्ये राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली. ----- सकारात्मक बदल आणि भविष्यातील दिशा आरोग्य व्यवस्थेतील त्रुटी दूर करून एक सक्षम आणि सर्वांसाठी उपलब्ध अशी व्यवस्था उभारण्यासाठी समाजात सकारात्मक दृष्टिकोन रुजण्याची अत्यंत गरज आहे. आज तंत्रज्ञानाची वेगाने प्रगती होत असली, तरी डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील जुना पारदर्शक संवाद पुन्हा प्रस्थापित होणे महत्त्वाचे आहे. उपचारांचे वाढते खर्च आटोक्यात आणण्यासाठी पारदर्शक विमा धोरणे आणि शासकीय स्तरावर अधिक सुलभ नियंत्रण यंत्रणा असणे भविष्यात फायदेशीर ठरू शकते. तसेच, मेडिकल टुरिझमच्या माध्यमातून जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा भारतात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होत आहेत, ही आपल्यासाठी नक्कीच एक जमेची आणि अभिमानास्पद बाजू आहे. भविष्यातील वैद्यकीय शिक्षणाचा भर केवळ गुणवत्ता आणि गुणांवर नसून भावी डॉक्टरांमध्ये सेवाभाव, माणुसकी आणि संवेदनशीलता निर्माण करण्यावर असला पाहिजे. जर सर्वांनी एकत्रित प्रयत्न केले आणि प्रत्येकाने आपल्या जबाबदारीचे भान ठेवले, तर आरोग्य क्षेत्र अधिक प्रगत, परवडणारे आणि सर्वसामान्यांच्या खऱ्या अर्थाने हिताचे बनू शकेल, यात कोणतीही शंका नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ज्ञानेश कुमार यांची खुर्ची जाणार, तुरुंगवारीही ठरलेली! रामलीला मैदानातून राहुल गांधींचा थेट इशारा...

RINKU SINGH: ठरलं तर मग! रिंकू सिंहच्या लग्नाची तारीख पक्की, बहीण नेहा सिंहने दिली मोठी अपडेट; शॉपिंगही झाली सुरू, जाणून घ्या सविस्तर

बांदेकरांच्या सुनेची झी मराठीच्या नव्या मालिकेत एन्ट्री! हर्षद अतकरी साकारणार 'अभ्या', तारीख आणि वेळ जाहीर

थंडीच्या दिवसांत ओठ फुटतात, कोरडे पडतात? पारिजातकाच्या फुलांपासून बनवा नॅचरल लिप बाम; ओठ राहतील मऊ!

Latest Marathi News Update : "भाजप कधीही पुन्हा सत्तेत येणार नाही!" अखिलेश यादव यांचा दावा; उत्तर प्रदेशातील मतचोरीवरून भाजपवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT