हाडांच्या आरोग्याबाबत जनजागृती, ८० जणांची तपासणी
विश्वभारती काॅलनी ः सदाचार संवर्धक ज्येष्ठ नागरिक संस्था, छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने ज्येष्ठ नागरिक दिन व कोजागरी पौर्णिमेनिमित्त श्री विश्वेश्वर महादेव मंदिराच्या सभागृहात मासिक सभा झाली. या मासिक सभेदरम्यान ८० ज्येष्ठ नागरिकांच्या हाडांच्या ठिसूळपणाची तपासणी करण्यात आली.
बाबूराव दुधगावकर यांच्या बासरी वादनाने सभेला सुरवात झाली. अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. अजय गौर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी संस्थेतील जवळपास ८० ज्येष्ठ नागरिकांच्या हाडांच्या ठिसूळपणाची तपासणी करून वाढत्या वयात हाडांची योग्य काळजी घेण्याचे महत्त्व, हाडांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी आवश्यक उपाययोजना तसेच हाडांशी संबंधित विविध समस्यांबाबत उपस्थित सभासदांना सविस्तर मार्गदर्शन केले. याच कार्यक्रमात संस्थेच्या सभासद सुषमा वझे, आचार्य धोंडोपंत, शोभना बोरसे, आशा कुबेरकर, विना विजय , सुहास कुलकर्णी, शेवाळे दत्तात्रेय, जुगलकिशोर मंत्री, माधुरी दुसे, माया पटवारी, दत्तात्रय सराफ, पीलखाने मधुकर, वंदना बोधनकर, देशपांडे सुधा, विजय चिंतामण, कोंडेकर मोतीलाल या सदस्यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. संस्थेचे पूर्व अध्यक्ष अनंत आचार्य यांची ‘फेसकॉम’च्या छत्रपती संभाजीनगर विभागीय अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल संस्थेतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अनिल चौधरी होते. यावेळी उपाध्यक्ष रमेश दुसे, सचिव बाळासाहेब देशपांडे, सहसचिव अनिल माधवराव कुलकर्णी, तसेच सदस्या रोहिणी कुलकर्णी व शैलजा आचार्य उपस्थित होत्या. सूत्रसंचालन अनिल कुलकर्णी यांनी केले. अध्यक्षीय समारोपानंतर सचिव बाळासाहेब देशपांडे यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.