औरंगाबाद - महानगरपालिका मुख्यालयातील झाड कोसळल्याने तीन ते चार वाहनांचा चुराडा झाला आहे.  Aurangabad Rain Updates
छत्रपती संभाजीनगर

Aurangabad Rain : औरंगाबादेत मुसळधार पाऊस,अनेक भागात पाणी

सकाळ डिजिटल टीम

औरंगाबाद - औरंगाबाद शहरात (Aurangabad) आज मंगळवारी (ता.२८) झालेल्या पावसामुळे दाणादाण उडाली आहे. अनेक सखल भागात पाणी जमा झाले आहे. काही लोकांच्या घरात, दुकानात पण पाणी शिरले आहे. विद्यानगर वार्डात वेदमंत्रा अपार्टमेंटसमोर तसेच अलंकार सोसायटीमध्ये समर्थ अपार्टमेंटमध्ये (Rain) पाणी घुसले आहे. क्रांती चौक वार्डात सिध्देशनगर भागात देखील नाल्याचा प्रवाह वाढल्यामुळे पाणी घुसले होते. त्या भागातील अभियंते नाना पाटील, परदेशी यांना सांगून ताबडतोब जेसीबी यंत्राने नाल्याचा प्रवाह वाहता केल्याने कुठलीही दुर्घटना घडली नाही.

शहरातील पावसाचे अपडेट्स

- बायपास बंद. प्रशांती हाॅटेलचा नाला भरून पाणी रस्त्यावर

- नागेश्वरवाडी, दलालवाडी, जाफरगेट, समर्थनगर, गारखेड्यात पाणीच पाणी सुंदरनाला भरून वाहू लागला

- खाम, सुखना नदीला पूर

- सखल भागात झपाट्याने पाणी शिरू लागले....

- बारूदगर नाल्यावरील घरात पाणी...हिमायतबाग परिसरातील नागरिकांचे शाळेत स्थलांतर करण्याची तयारी...

- उल्का नगरीत झाड कोसळले. कैलासनगर येथे घरांमध्ये पाणी शिरले. हर्सूल तलावातून साडेतीन फूट पाण्याचा सांडवा सुरू

- मनपा मुख्यालयातील झाड कोसळले. तीन ते चार वाहनांचा चुराडा

- खाम नदी भरून वाहत असल्याने लोकांची पाणी पाहायला गर्दी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India : सूर्यकुमार यादवसाठी दरवाजे अजूनही खुले... माजी कर्णधाराचे टीम इंडियात पुनरागमन शक्य... जाणून घ्या, कसं!

RBI News: WhatsApp वर RBI चा मेसेज आला? खिशातील रुपया आता मोबाईलमध्ये! डिजिटल रुपया म्हणजे काय आणि तो कसा वापरायचा जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय पेरांबूरला भेट देत आहेत

IND vs ENG: 'Lords' वर देव! भारतीय महिला खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी पोहोचला सचिन तेंडुलकर Video

Devkund News: देवकुंड डोहात बुडालेल्या दोन्ही तरुणांचे मृतदेह 50 फूट खोल डोहात सापडले; अवघ्या पंधरा मिनिटात रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी

SCROLL FOR NEXT