लासूर स्टेशन (ता.गंगापूर) : परिसरात जोरदार पाऊस झाल्याने शिवना नदी दुथडी भरुन वाहतेय. सकाळ
छत्रपती संभाजीनगर

दमदार पावसाने पिके तरारली, शिवना नदी दुथडी भरुन वाहतेय

अविनाश संगेकर

लासूर स्टेशन (जि.औरंगाबाद) : लासूर स्टेशन (ता.गंगापूर) (Lasur Station) परिसरात दमदार पाऊस झाला असून लासूरगाव (ता.वैजापूर) (Vaijapur) येथून वाहणारी शिवना नदी यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदा दुथडी भरून वाहत आहे. नदीवरील फरशी पुलावरून पाणी वाहत असल्याने ग्रामस्थांना जीव धोक्यात घालून ये-जा करावी लागत आहे. या पुलाची उंची वाढवावी, अशी कित्येक वर्षांपासून मागणी आहे. तर नदीला पाणी आल्याने परिसरातील पाणीप्रश्न सुटण्यास मदत होईल. लासूर स्टेशन परिसरात गेल्या तीन दिवसांत दमदार पाऊस झाला असून लासूरगावच्या शिवना नदीलाही (Shivana River) पाणी आले असून कधी वेगाने तर कधी संथ प्रवाह आहे. या दरम्यान नदीवरील फरशी पुलावरून सातत्याने पाणी वाहत असून पाण्याचे प्रमाण कमी-जास्त होत असल्याने (Aurangabad) ग्रामस्थांना पाण्याचा अंदाज घेऊन ये-जा करावी लागते. शिवना नदीला पाणी आल्याने परिसरातील विहिरींची पाणीपातळी वाढणार असल्याने शेतकरी, ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

शिवना नदीच्या फरशी पुलावरून पाणी वाहत असल्याने मात्र वाहतुकीची मोठी गैरसोय झाली आहे. नदीपर्यंत आलेल्यांना पाण्याचा अंदाज घेता येत नसल्याने आल्या पावली परतून तब्बल सहा किलोमीटर फेरा मारून मुंबई महामार्गावरील पुलावरून गावात यावे लागत आहे. या फरशी पुलाची उंची वाढवावी, अशी मागणी कित्येक वर्षापासून करण्यात येत असून काही वर्षापूर्वी या ठिकाणी बंधारा उभारून त्यावरून रस्ता करण्याच्या दृष्टीने पाहणी करण्यात आली होती. परंतु पुढे कोणतीही हालचाल झाली नाही. परिणामी या पुलावरून पाणी आल्यास वाहतुकीचा खोळंबा होतो. नदीच्या पैलतीरी असणाऱ्या जिल्हा परिषद प्रशालेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचीही होते. परिसरातून वाहणाऱ्या शिवना, मार्तंडी नदीला आलेल्या पाण्यामुळे विहिरींची पाणीपातळी वाढण्यास मदतच होईल. तसेच पावसामुळे पिकेही तरारली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणेकरांसाठी मोठी खुशखबर! विमानतळावरून १५ नवीन विमानांची उड्डाणे; कुठे आणि कधीपासून? जाणून घ्या...

Vaibhav Sooryavanshi ला भारतीय संघात पदार्पणाची संधी द्यायला हवी का? ऑस्ट्रेलियन दिग्गज म्हणतो, अरे त्या पोराला खेळू द्या...

Pune Crime : सासरच्या छळाला कंटाळून महिलेने संपविले जीवन; सासरे व दिराविरुद्ध गुन्हा दाखल

Pune Water Supply News : शहरातील पाणीपुरवठा गुरुवारी सुरळीत राहणार

RCB vs LSG: भुवनेश्वर-रसिकची जोडी भारी! लखनौचा फलंदाजी क्रम पूर्णपणे ढासळला, आरसीबीला किती धावांचं आव्हान?

SCROLL FOR NEXT