छत्रपती संभाजीनगर

विकासकामांना निधीचा अडसर

CD
अतिवृष्टीमुळे ‘वाट’ लागलेले रस्ते, पूल दुरुस्तीच्या प्रतीक्षेत निधीअभावी विकासकामांना ब्रेक; २०० कोटींचा प्रस्ताव रखडला धाराशिव, ता. १५ (बातमीदार) : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या ग्रामीण भागातील रस्ते आणि पुलांच्या दुरुस्तीसाठी २०० कोटी रुपयांपेक्षा अधिक निधीची गरज आहे. यासाठीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवून वर्ष उलटले, तरी अद्याप मंजुरी मिळालेली नाही. दुसरीकडे, जिल्हा परिषदेचा कारभार लोकप्रतिनिधींच्या हाती येऊन आठ महिने झाले असले, तरी निवडणुकांच्या आचारसंहितेचे चक्र आणि निधीचा अभाव यामुळे विकासकामांना अपेक्षित गती मिळालेली नाही. ऑगस्ट आणि सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अनेक रस्ते आणि पुलांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली. या कामांसाठी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने २९ सप्टेंबर २०२५ ला राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाकडे निधीचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवला होता. मात्र, त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. परिणामी, तात्पुरती दुरुस्ती करूनच या रस्त्यांवरून वाहतूक सुरू आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना खराब रस्ते आणि पुलांवरून प्रवास करावा लागत आहे. प्रशासकीय राजवटीत पाठविण्यात आलेल्या या प्रस्तावाला मंजुरी मिळवून निधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आता लोकप्रतिनिधींवर आहे. त्यासाठी पदाधिकारी आणि सदस्यांनी यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ‘आपला जीव-धाराशिव’ या उपक्रमांतर्गत काही कामांना सुरवात झाली आहे. मात्र, ग्रामीण भागातील रस्ते, आवश्यक इमारतींची बांधकामे आणि अन्य पायाभूत सुविधांच्या कामांना अद्याप अपेक्षित वेग आलेला नाही. ........................................ ((चौकट)) लोकप्रतिनिधी आले, पण कामांचा खोळंबा जिल्हा परिषदेतील प्रशासक राजवट संपल्यानंतर लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने अनेक कामे रखडली आहेत. त्यामुळे आचारसंहितेचे निर्बंध आणि निधीची प्रतीक्षा या फेऱ्यात ग्रामीण विकास अडकला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नाना पाटेकरांनी सिंहगडाच्या पायथ्याशीच फार्महाऊस का बांधलं? पुरुषोत्तम बेर्डेंनी सांगितलं कारण, म्हणालेले- इथून महाराजांचे...

Akola District Drought : दुष्काळाच्या झळा; लोणी गावातील दुग्ध व्यवसाय संकटात! पाणी आणि चाऱ्याअभावी पशुपालक हवालदिल; म्हशी विकण्याची वेळ

Latest Marathi News Update : मसाल्यांमध्ये रंगांचा वापर चालणार नाही- तुकाराम मुंढे

Indian Army Alert: भारतात घुसण्यासाठी 500 दहशवादी रेडी! 'पीओके'मध्ये लपून बसल्याची माहिती; लष्कराकडे महत्त्वाचे इनपुट्स

US Work Permit Rules: ट्रम्प यांचा भारतीयांना मोठा झटका! वर्क परमिट संपल्यावर नोकरी जाणार?

SCROLL FOR NEXT