छत्रपती संभाजीनगर

नऊ हजार दुचाकीस्वारांवर कारवाई

CD
अँकर पान १ -- नऊ हजार दुचाकीस्वारांवर कारवाई - लातूर जिल्ह्यात हेल्मेट सक्तीची मोहीम, हेल्मेटच्या गुणवत्तेची तपासणी ---- सकाळ वृत्तसेवा लातूर, ता. १२ ः वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर दुचाकीस्वारांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत लातूर जिल्हा पोलिसांनी (ता. एक) संपूर्ण जिल्ह्यात हेल्मेट वापराबाबत विशेष मोहीम सुरू केली आहे. पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहिमेचा पहिला टप्पा राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्गांवर राबविण्यात येत असून, आतापर्यंत ९ हजार २३६ विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली आहे. हेल्मेट सक्तीचा निर्णय हा केवळ वाहनचालकांकडून दंड वसूल करण्याच्या उद्देशाने घेण्यात आलेला नाही, तर नागरिकांचे प्राण वाचविणे आणि अपघातांमध्ये होणारी जीवितहानी कमी करणे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे लातूर पोलिसांनी स्पष्ट केले आहे. हेल्मेट सक्तीच्या मोहिमेचा पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांच्याकडून दररोज आढावा घेतला जात आहे. जिल्ह्यातील संबंधित अधिकारी व अंमलदारांना आवश्यक त्या सूचना देऊन कारवाईसोबतच नागरिकांमध्ये हेल्मेट वापराबाबत प्रभावी जनजागृती करण्यावर भर देण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व दुचाकीस्वारांनी पोलिसांच्या या मोहिमेला सहकार्य करून प्रत्येक वेळी दुचाकी चालविताना दर्जेदार हेल्मेटचा वापर करावा, स्वतःचे आणि आपल्या कुटुंबाचे संरक्षण करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. --- कारवाईच्या ठिकाणीच हेल्मेट विक्रीची सुविधा हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी सुरू असलेल्या ठिकाणी नागरिकांना सहजपणे दर्जेदार हेल्मेट उपलब्ध व्हावे, यासाठी हेल्मेट विक्रेत्यांनाही पोलिसांकडून आवाहन करण्यात आले आहे. कारवाई सुरू असलेल्या ठिकाणी हेल्मेट विक्रीची सुविधा उपलब्ध करून देण्याची विनंती विक्रेत्यांना करण्यात आली आहे. त्याचबरोबर बाजारात विक्री होणाऱ्या हेल्मेटचा दर्जा उच्च प्रतीचा आहे का, तसेच त्याची किंमत वाजवी आहे का, याचीही नियमितपणे तपासणी करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock: 1 लाखांचे झाले तब्बल 1.35 कोटी! फक्त 6 महिन्यांतच पैसा तिप्पट; पाहा गुंतवणूकदारांना मालामाल करणारा शेअर

Ganeshotsav Rules: गणेशोत्सवात नियमभंग करणाऱ्या मंडळांवर गुन्हे दाखल; वाघोली पोलिसांचा कडक इशारा

Ayurvedic Remedies for Arthritis: संधिवातामुळे चालणंही कठीण होतंय? मग 'हे' ३ आयुर्वेदिक उपाय देतील सांध्यांना आराम!

Nagpur Crime : जादूटोण्याच्या संशयातून सासऱ्याकडून कुऱ्हाडीने सुनेचा खून

Oppo Smartphone: 7000mAh बॅटरी अन् 120Hz डिस्प्ले! 16 सप्टेंबरला लाँच होतोय Oppo चा सर्वात स्वस्त स्मार्टफोन! किंमत फक्त...

SCROLL FOR NEXT