छत्रपती संभाजीनगर

हेल्मेटमुळे डोक्याची गंभीर दुखापत टळली

CD
हेल्मेटमुळे डोक्याची गंभीर दुखापत टळली ----------- लातूर, ता. २४ ः दुचाकी चालवताना हेल्मेट परिधान करणे किती महत्त्वाचे आहे, याचा प्रत्यय हाडोळती-शिरूर महामार्गावर घडलेल्या अपघातातून पुन्हा एकदा आला आहे. शुक्रवारी (ता. २३) सायंकाळी सुमारे ६ च्या सुमारास रस्त्यावर अचानक कुत्रा आडवा आल्याने दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार ऋषीकेश पांढरी नागणे (वय ५९, रा. मेथी, ता. अहमदपूर) यांच्या पायाला दुखापत झाली. मात्र, त्यांनी हेल्मेट परिधान केलेले असल्यामुळे डोक्याला होणारी संभाव्य गंभीर दुखापत टळली. ऋषीकेश नागणे हे आपल्या पत्नीसह पाहुण्याच्या अंत्यविधीसाठी गेले होते. अंत्यविधी आटोपून ते दुचाकीवरून आपल्या मेथी या गावी परत जात असताना हाडोळती- शिरूर महामार्गावर अचानक कुत्रा रस्त्यावर आडवा आला. त्यामुळे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी घसरून अपघात झाला. या घटनेत नागणे यांच्या पायाला मार लागला; मात्र हेल्मेटमुळे त्यांच्या डोक्याचे संरक्षण झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक रायबोळे यांनी तत्परतेने घटनास्थळी धाव घेतली. जखमी नागणे यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. रस्ते अपघात अनपेक्षितपणे घडतात. अशा वेळी हेल्मेटमुळे डोक्याला होणारी गंभीर दुखापत आणि जीवितहानीचा धोका कमी होण्यास मदत होते. नागणे यांच्यासोबत घडलेली घटना प्रत्येक दुचाकीस्वारासाठी महत्त्वाचा संदेश देणारी असल्याचे बोलले जात आहे.

ड्रायव्हिंग लायसन्स काढणं होणार कठीण! ऑनलाइन परीक्षेत आता ७५% गुणांची अट, केंद्र सरकारचा नवा प्रस्ताव

VIRAT KOHLI: विराट कोहलीचा सराव सुरू, न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेचा थरार कधी रंगणार? जाणून घ्या ५ सामन्यांचं संपूर्ण वेळापत्रक

Latest Marathi News Live Update : भंडाऱ्याच्या कोरंभी बायपासवर भीषण अपघात; वाहतूक पोलिसाचा मृत्यू

Rashmika Mandanna: ‘त्या’ दिवसांत विजय असतो रश्मिकाचा आधार; अभिनेत्रीने सांगितली एक खास गोष्ट

Beed Theft : धुळे-सोलापूर महामार्गावर हॉटेलवर थांबलेल्या प्रवाशांच्या कारचे लॉक उघडून ६.५५ लाखांचे दागिने लंपास; बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT