औरंगाबाद : राज्यात अतिवृष्टी, पुरामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. राज्य शासनाने गुरुवारी (ता. आठ) मदतीची घोषणा केली असून, राज्यात ३५०१ कोटी तर औरंगाबाद विभागाला एक हजार ८ कोटींची मदत मिळणार आहे. मदतीचे पैसे येत्या सोमवारपासून बॅंक खात्यावर जमा होणार आहेत. यंदाच्या पावसाळ्यात मराठवाड्यासह राज्यात अतिवृष्टी, पुरामुळे मोठे नुकसान झाले. मराठवाड्यात जुलैत पाच लाख ८७ हजार ४६६.४१ तर ऑगस्टमध्ये एक लाख ४० हजार ३३१.४४ असे सात लाख ३६ हजार १३३.३८ हेक्टर जिरायती व फळबाग क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले. या नुकसानभरपाईसाठी शासनाने गुरुवारी एक हजार आठ कोटी रुपयांची मदत जाहीर केली. विभागातील १० लाख नऊ हजार २७० शेतकऱ्यांना सोमवारपासून बँक खात्यावर रक्कम दिली जाणार आहे.
तसेच राज्यातील सुमारे २५ लाख ९३ हजार शेतकऱ्यांना तीन हजार ५०१ कोटी रुपयांची मदत जाहीर झाली आहे. राज्याचे बाधित क्षेत्र २३ लाख ८१ हजार इतके आहे. मुख्यमंत्र्यांनी तीन हेक्टरपर्यंत नुकसानभरपाई देण्याचे जाहीर केल्याने व सततच्या पावसामुळे होणाऱ्या नुकसानीचाही मोबदला मिळेल, अशी घोषणा केल्याने मराठवाड्याला अनुदान वाटपासाठी एक हजार ५९६ कोटी ९१ लाख ५७ हजार रुपयांचा निधी लागणार आहे. तसा प्रस्ताव विभागीय आयुक्तालयाने राज्य शासनाला सादर झाला होता. त्या तुलनेत केवळ अतिवृष्टीची नुकसान भरपाईची एक हजार आठ कोटीची मदत जाहीर केली आहे. एनडीआरएफच्या निकषापेक्षा दुपटीने मोबदला जाहीर केला आहे.
मदत आजपासून जमा करा ; सत्तार
जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांना कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले की, राज्य शासनाने जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर शुक्रवारपासूनच (ता. ९) जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, असे त्यांनी नमूद केले.
‘लंपी’रोखण्यासाठी पशूंची वाहतूक बंद
जनावरांमध्ये लंपी त्वचारोगाची साथ रोखण्यासाठी परराज्यातून व अंतरजिल्ह्यात पशुधनाची वाहतुक थांबवण्यात आली आहे. तसेच पशूंचे आठवडी बाजारही तात्पुरते बंद करण्यात आले आहेत. तसेच लंपी त्वचा रोगामुळे ज्यांचे पशूधन दगावले असेल त्या पान ६ वर
अतिवृष्टीग्रस्तांना येत्या सोमवारपासून मदत पशूपालकाला जिल्हा परिषदेकडून तातडीची मदत म्हणून १० हजार रूपये द्यावे, असे निर्देश महसूल तथा दुग्ध विकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत. राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुरूवारी (ता.आठ) विभागीय आयुक्त कार्यालयात लंपी त्वचारोगाच्या अनुषंगाने आढावा घेतला. या बैठकीनंतर त्यांनी माहिती दिली. राज्यात १ कोटी ९२ लाख जनावरे आहेत. सध्या या रोगामुळे राज्यातील ३२ जनावरे दगावली आहेत. प्रामुख्याने १७ जिल्ह्यात ५ लाख ७५ हजार जनावरे आहेत. त्यामुळे या जिल्ह्यात ज्या भागात ही साथ जनावरांमध्ये आढळली. तेथील ५ एकर क्षेत्र परिसरातील जनावरांचे शंभर टक्के लसीकरण करणे, तेथील जनावरांच्या औषधोपचारावर भर देण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.