छत्रपती संभाजीनगर

दहावी, बारावी विद्यार्थ्यांसाठी मंडळाकडून हेल्पलाइन सुविधा

परीक्षा तणावमुक्त होण्याच्या दृष्टीने कोरोना काळातील विशेष उपाययोजनांची माहिती देण्यासाठी विद्यार्थी, पालकांच्या शंका निरसनासाठी समुपदेशकांची नियुक्ती केली

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी आणि बारावीच्या परीक्षा ४ मार्च ते ४ एप्रिलदरम्यान आयोजित करण्यात आल्या आहेत. या परीक्षा तणावमुक्त होण्याच्या दृष्टीने कोरोना काळातील विशेष उपाययोजनांची माहिती देण्यासाठी विद्यार्थी, पालकांच्या शंका निरसनासाठी समुपदेशकांची नियुक्ती केली. विभागीय मंडळाचे सचिव आर.पी. पाटील यांनी परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.

राज्य मंडळातर्फे ४ ते ३० मार्चदरम्यान बारावी, तर १५ मार्च ते ४ एप्रिलदरम्यान दहावीची परीक्षा होणार आहे. यंदा कोरोनाकाळात परीक्षा होत असल्यामुळे शिक्षण मंडळाने केलेल्या उपाययोजना, परीक्षेचे स्वरूप, पालक, विद्यार्थी आणि संबंधित घटकांच्या शंकाचे निरसन करण्यासाठी मंडळाकडून नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या कक्षातील समुपदेशकांद्वारे सकाळी नऊ ते सायंकाळी सात यावेळेत आवश्यक समुपदेशन सुविधा मिळणार आहे. असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

विभागातील जिल्हानिहाय समुपदेशक

औरंगाबाद

बाळासाहेब चोपडे, बालज्ञानमंदिर मा. विद्यालय, खडकेश्वर ः मो. ९२८४८४७५८२

शशीमोहन शिरसाट, वरिष्ठ समुपदेशक, विभागीय व्यवसाय मार्गदर्शन व निवड समिती ः ९४२२७१५५४६

बीड

एस.पी. मुटकुळे, संत कैकाडी महाराज विद्यालय, वाघळूज (ता.आष्टी) ः ९६८९६४०५००

सी.ए. सैदाने, केदारी महाराज विद्यालय नंदनज (ता.परळी) ः ९४२२९३०५९९

जालना

एस.टी. पवार, योगानंद विद्यालय, परतूर (जि. जालना) ः ९४०५९१३८००

सूर्यकांत खांडेभरड, शंभू महादेव विद्यामंदिर, वाटूर (जि. जालना) ः ९४०४६०६४७९

परभणी

पी.एम. सोनवणे, बाल विद्यामंदिर, नानलपेठ (जि. परभणी) ः ९४२२१७९१०१

अमीरखान, डॉ. झाकीर हुसेन शाळा व कॉलेज, परभणी ः ९८६०४४४९८६

हिंगोली

एस.जी. खिल्लारे, जि.प. प्रशाला येहळेगाव (सो) ता. औंढा नागनाथ : ९०११५९४९४४

डी.आर. चव्हाण, गोवर्धनदास मुंदडा हायस्कूल, सिरसम : ९८२२७०६१०२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delimitation Commission: SIR नंतर आता मतदारसंघ पुनर्रचनेची जबाबदारीही ज्ञानेश कुमार यांच्याकडेच?

दीड वर्षानंतर राहू-केतू बदलणार राशी! ५ डिसेंबरपासून ६ राशींचं नशीब चमकणार, नेमका काय बदल घडणार?

Health Minister : आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची पाचोड ग्रामीण रुग्णालयाला रात्री अचानक भेट; रुग्णांशी संवाद साधून आरोग्य सुविधांचा घेतला आढावा

Baramati News : मे-जून २०२७ पर्यंतचा टंचाई आराखडा तयार करा! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश

Manchar Police : गुन्हे नियंत्रणापासून लोकजागृतीपर्यंत उल्लेखनीय कामगिरी, मंचर पोलिसांना उत्कृष्ट पोलीस ठाण्याचा पुरस्कार; नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव

SCROLL FOR NEXT