वाढीव वीज बिलाचा शाॅक sakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : हर्सूल तलावात होणार वीज निर्मिती!

दहा वॅटच्या सौरऊर्जा प्रकल्पासाठी प्रशासकांचे सीएसआर फंडातून प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : शहरातील १४ वॉर्डांची तहान भागिणाऱ्या हर्सूल तलावातून आता वीज निर्मितीसाठी प्रयत्न केले जात आहेत. तलावाची ३६४ एकर जागा असून, या जागेत सौर ऊर्जा प्रकल्पासाठी पॅनेल बसविण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. तसेच तलावात बोटिंगही लवकर सुरू होईल. खाम नदीपात्रातील तीन जुन्या बंधाऱ्यांची दुरवस्था झाली आहे. या बंधाऱ्यांची दुरुस्ती सामाजिक दायित्व निधीतून (सीएसआर फंड) केली जाईल, असे महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले.

शहराच्या पाण्याची नाथसागरावर मदार असली तरी काही वर्षांत हर्सूल तलावाने महापालिकेला दिलासा दिला आहे. तलावातून दररोज साडेचार ते पाच एमएलडी पाणी उपसा केला जातो. त्यामुळे जायकवाडीवरील पाणी योजनेवरचा ताण काहीसा कमी झाला आहे. जायकवाडी धरणातून शहरापर्यंत पाणी आणताना महापालिकेला अनेक ठिकाणी पंपिंग करावे लागते. त्यामुळे वीज कंपनीला तब्बल सहा ते सात कोटी रुपये वीज बिल भरावे लागते. परिणामी राज्यातील सर्वाधिक महाग पाणी औरंगाबादकरांना घ्यावे लागत आहे.

पाणी पुरवठा योजनेवरील वीज बिल कमी करण्यासाठी काही वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. जायकवाडी धरणात सौर ऊर्जेचे पॅनेल बसवून वीज निर्मिती केली जाईल, असे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी सांगितले होते. पण त्याचे पुढे काहीच झाले नाही. दरम्यान त्यांनी हर्सूल तलावात हा प्रयोग करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. यासंदर्भात प्रशासक श्री. पांडेय यांनी सांगितले की, हर्सूल तलावातून दररोज १० वॅट वीज निर्मिती झाल्यास महापालिकेच्या वीज बिलाचा खर्च कमी होणार आहे. त्यानुसार नुकत्याच झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. वीज निर्मितीसाठी सीएसआर निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्यासोबतच पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी बोटिंगही सुरू करण्यात येईल, असे श्री. पांडेय यांनी सांगितले.

तीन बंधाऱ्यांची दुरुस्ती

हर्सूल तलाव ओव्हरफ्लो झाल्यानंतर खाम नदीला पूर येतो. हे पाणी अडविण्यासाठी खाम नदीपात्रात जुने तीन बंधारे होते. मात्र त्याची पडझड झाल्याने आता नदीपात्रात पाणी थांबत नाही. या बंधाऱ्यांची दुरुस्ती करून नदीत कायम पाणी राहील, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी सुमारे ३५ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित हा निधी देखील सीएसआरमधून निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे, असे श्री. पांडेय यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana September Installment Date : लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! सप्टेंबरचा 1500 रुपयांचा हप्ता कधी मिळणार? समोर आली संभाव्य तारीख

मुंबईची धावपळ नकोशी! मुंबई सोडून हिमाचलमध्ये शिफ्ट होणार यामी गौतम-आदित्य धर? पण नक्की कारण काय?

Iran Missile Range : इराणच्या एकाच घोषणेमुळे अमेरिकेला भीती; ब्रिटनमधून बी-१ बॉम्बर विमाने परत बोलावली

Latest Marathi News Live Update : मराठवाड्यात पदवीधर मतदार संघाच्या प्रारूप यादीमध्ये उद्धव ठाकरेंचे नाव

Sujay Vikhe Patil: दुष्काळात शेतकऱ्यांना मदत महत्त्वाची; जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध करण्यामागे हाच हेतू : माजी खासदार सुजय विखे पाटील

SCROLL FOR NEXT