Gold Rate sakal
छत्रपती संभाजीनगर

Gold Rate : ऐन लग्नसराईत सोन्याची उच्चांकी दरवाढ ; सात हजार रुपये प्रतिग्रॅम,वधू पित्याची होतेय दमछाक

दिवसेंदिवस वाढत असलेल्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यातच भर म्हणून आता ऐन लग्नसराईत सोन्याच्या दरामध्ये उच्चांकी दरवाढ झाली आहे. सोन्याने सात हजार रुपये प्रतिग्रॅम दर पार केला असून, या लग्नसराईमध्ये वधूपित्यांची दमछाक होताना दिसत आहे.

सकाळ वृत्तसेवा

माजलगाव : दिवसेंदिवस वाढत असलेल्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यातच भर म्हणून आता ऐन लग्नसराईत सोन्याच्या दरामध्ये उच्चांकी दरवाढ झाली आहे. सोन्याने सात हजार रुपये प्रतिग्रॅम दर पार केला असून, या लग्नसराईमध्ये वधूपित्यांची दमछाक होताना दिसत आहे.

लग्न असो किंवा कुठलेही फंक्शन असो या ठिकाणी सोन्याला फार महत्त्व आहे. महिला वर्गास सर्वाधिक प्रिय म्हणून देखिल सोन्याकडे पाहिले जाते. तर, लग्नामध्ये वधू- वर यांना सोन्याचे दागिने दिले जातात. परंतु, मागील दोन महिन्यांत पाहिले तर सोन्याची सर्वाधिक भाववाढ झाली आहे. सध्या सोने सात हजार रुपये प्रतिग्रॅम झाले असल्याने सर्वसामान्यांसह वधू पित्याची सोने खरेदी करताना दमछाक होत आहे.

त्यामुळे सोने दरवाढीचा मोठा परिणाम होत आहे. दरम्यान, सर्व क्षेत्रात होणारी दरवाढ ही सुरूच आहे. परंतु, शेतकऱ्यांच्या शेतीमालाची मात्र दरवाढ होणे थांबले आहे. तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या घरात आजही सोयाबीनसह कापूस तसाच पडून आहे.

टेम्पल ज्वेलरीला महत्त्व

दिवसेंदिवस सोन्याच्या दरामध्ये वाढ होत असली तरी देखिल आजच्या या डिजिटल युगामध्ये नवं- नविन दागिन्यांना अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. जुन्या काळामध्ये टेम्पल ज्वेलरीला एक वेगळे महत्त्व होते. आज देखिल या टेम्पल ज्वेलरीची भुरळ तरूणींसह महिला वर्गामध्ये आहे. सराफा दुकानात या लग्नसराईत टेम्पल ज्वेलरीला मोठी मागणी आहे.

पारंपारिक दागिन्यांसह टेम्पल ज्वेलरी आणि नविन डिझाईन विक्रीसाठी तयार आहेत. परंतु, सोन्याच्या दरांमध्ये होत असलेल्या दरवाढींमुळे ग्राहक मात्र जेमतेमच सोन्या- चांदीचे दागिने खरेदी करत आहे. ऐन लग्नसराईत दरवाढ झाल्याने सराफा बाजारात मात्र ग्राहक अत्यल्प प्रमाणात आहे.

- चंद्रकांत देशमुख, सराफा व्यावसायिक

यावर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे कापसाचे उत्पादन अत्यंत कमी प्रमाणात झाले. त्यातच या महिन्यामध्ये मुलीचा विवाह सोहळा आहे. सोन्याच्या दरात वाढ होत असल्याने मनी मंगळसूत्र व मोजकेच दागिने खरेदी करण्याची वेळ आली आहे.

- रोहिदास पवार, वधुपिता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील निवडणूक मोदी शाहांनी आपल्यावर घेतली : आशुतोष रांका

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT