छत्रपती संभाजीनगर

किनवटमध्ये महामार्गावरील अतिक्रमणाविरोधात संघर्ष समिती आक्रमक

CD
महामार्गावरील अतिक्रमणाविरोधात एल्गार ---- किनवटमध्ये दोन ऑक्टोबरपासून बेमुदत उपोषणाचा इशारा --- गोकुंदा, ता.१५ (बातमीदार) : किनवट शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१-ए वरील अतिक्रमणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. महामार्गावरील अतिक्रमणे तातडीने हटवून रस्ता मोकळा करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रीय महामार्ग १६१-ए रस्ता रुंदीकरण संघर्ष समितीने आक्रमक भूमिका घेतली आहे. संबंधित अतिक्रमणे तातडीने हटविण्यात आली नाहीत, तर २ ऑक्टोबर २०२६ रोजी संबंधित कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा समितीने किनवटच्या सहायक जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे. समितीच्या निवेदनानुसार, सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन तसेच जिल्हाधिकारी, नांदेड यांनी राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमणे हटविण्याबाबत यापूर्वी निर्देश दिले आहेत. मराठवाडा विभागात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू असतानाही किनवट शहर आणि तालुक्यात अतिक्रमणे हटविण्याची कार्यवाही प्रभावीपणे झालेली नसल्याचा आरोप समितीने केला आहे. किनवट शहरातील काही ठिकाणी रस्त्याच्या मध्यभागापासून निर्धारित अंतर न सोडता बांधकामे करण्यात आली असून, काही ठिकाणी बसथांब्यालगतही अतिक्रमण झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून, नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण झाल्याचे समितीचे म्हणणे आहे. ------ नियमांचे उल्लंघन शहरातील क्रीडा संकुल, तहसील कार्यालय, दिवाणी न्यायालय, जिल्हा परिषद व्यापारी संकुल आदी ठिकाणी रस्त्याच्या मध्यभागापासून १८ मीटर अंतर सोडून बांधकाम करण्याचे निकष असतानाही त्याचे उल्लंघन झाल्याचा दावा संघर्ष समितीने केला आहे. सर्वोच्च न्यायालय आणि शासनाच्या निर्देशानुसार महामार्गावरील अतिक्रमणे तातडीने हटवून राष्ट्रीय महामार्ग मोकळा करावा. अन्यथा २ ऑक्टोबरपासून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रीय महामार्ग १६१-ए रस्ता रुंदीकरण संघर्ष समितीने दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राष्ट्रपतींचे माजी ADC मेजर ऋषभ सिंह संब्याल यांनी घेतली ३०व्या वर्षी निवृत्ती; १२ वर्षांच्या सेवेनंतर किती पेन्शन मिळणार?

ZIM vs AUS : सचिन तेंडुलकरचा 'तो' विक्रम, आता त्याचा राहीला नाही! झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलरचा वन डे क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम

US Student Visa Update: भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्या चार वर्षांच्या व्हिसा नियमांना स्थगिती

Pakistan Cricket : पाकिस्तानात शाहिद आफ्रिदीच्या नावावरून पसरलीय अफवा; नेमकं काय घडलं?

कोकणात मध्यरात्री बाप्पाची ‘चोरी’ होते? दारात गणपती ठेवून फटाके फोडण्यामागचं कारण ऐकून व्हाल भावूक!

SCROLL FOR NEXT