छत्रपती संभाजीनगर

आकाशात ढग दाटले; पण पावसाचा थेंब नाही!

CD
आकाशात ढग दाटल्याने शेतकऱ्यांना पावसाची आस ------ हिंगोली, ता. २८ ः ऐन पावसाळ्यात पावसाने पाठ फिरविल्याने यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातचा गेला. जवळपास अडीच महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, विहिरींनी तळ गाठला आणि बोअरवेलही कोरडे पडले आहेत. त्यातच साठवण प्रकल्पांमधील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अशा संकटाच्या काळात बुधवारी (ता. २८) जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या; मात्र दिवसभरात पावसाचा एक थेंबही न पडल्याने शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. जिल्ह्यात यंदा पावसाच्या दीर्घ खंडाचा खरीप पिकांना मोठा फटका बसला आहे. सध्या शेतात उभी असलेली हळद, कापूस आणि तूर ही पिके पाण्याअभावी करपू लागली आहेत. पिकांच्या वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यावरच पावसाने दडी मारल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पेरणी, खते, औषधे आणि मशागतीसाठी केलेला खर्च वाया जाण्याची शक्यता असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. तसेच पावसाअभावी रब्बीचे क्षेत्रही निम्म्यावर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दुसरीकडे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, बुधवारी सकाळापासून वातावरणात बदल जाणवत होता. आकाशात ढगांची दाटी झाल्याने उन्हाची प्रखरता कमी झाली होती. दिवसभरात कमी-अधिक प्रमाणात का होईना पाऊस होईल, अशी आशा निर्माण झाली होती. मात्र, सायंकाळपर्यंत कुठेही पावसाचा थेंब पडला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs ZIM W: भारतीय महिला संघाची विजयी हॅटट्रिक! ५ विकेट्स घेऊन झिम्बाब्वेचे कंबरडे मोडणारी Vaishnavi Sharma कोण?

Raj Thackeray Karjat tree cutting visit : "गुजरातमधल्या एका कंपनीसाठी हा सारा खटाटोप!"; कर्जतच्या जंगलात स्वतः उतरताच राज ठाकरेंचा सरकारवर थेट वार, सभेत तोफ धडाडणार!

Marathi News Live Updates : मराठवाडा पदवीधर निवडणुकीत विजयाची आघाडी मिळताच राष्ट्रवादी शरद पवार गटाचा धाराशिवमध्ये जोरदार जल्लोष!

Numerology: करिअरमध्ये मोठी रिस्क घ्यायला घाबरत नाहीत 'या' मूलांकाचे लोक; नवीन स्किल्स शिकण्यात असतात नंबर वन!

WPL 2027 Auction: सोलापूरच्या शेतकरी कुटुंबातील 'किरण' DCच्या ताफ्यात; मुंबई इंडियन्सकडून जोरदार प्रयत्न, पण.. कोण आहे Kiran Navgire?

SCROLL FOR NEXT