छत्रपती संभाजीनगर

चिश्तीया महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा

CD
खुलताबाद ः येथील चिश्तीया महाविद्यालय, खुलताबाद येथे मंगळवारी (ता.१५)आजीवन शिक्षण व विस्तार विभाग आणि हिंदी विभागाच्या संयुक्त विद्यमाने हिंदी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमास महाराष्ट्र बँक, खुलताबाद शाखेचे प्रबंधक कुशल जाधव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सय्यद आसिफ झकेरिया होते. व्यासपीठावर डॉ. सय्यद इक्बाल मजाज, डॉ. रुबीना खान आणि डॉ. मोहम्मद अली उपस्थित होते. यावेळी डॉ. सय्यदा अर्शिया कादरी, डॉ. सुभाष बागल, डॉ. अफरोजा खातून, डॉ. पुरुषोत्तम रामटेके आणि प्रा. शफी मौलाना यांनी हिंदी भाषेविषयी मनोगत व्यक्त केले. प्रमुख पाहुणे कुशल जाधव यांनी हिंदी भाषेचे महत्त्व अधोरेखित करताना बँकिंग क्षेत्रातही हिंदी भाषेचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात असल्याचे सांगितले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. सय्यद आसिफ झकेरिया यांनी हिंदी भाषेच्या समृद्ध इतिहासावर प्रकाश टाकला. स्वातंत्र्यानंतर देशातील नागरिकांना एका भाषेच्या माध्यमातून जोडणे महत्त्वाचे होते. त्या काळात हिंदी भाषेला महत्त्वाचे स्थान देण्यात आले. दूरदर्शनवर ‘महाभारत’ मालिकेचे हिंदीतून प्रसारण झाल्याने हिंदी भाषेचा प्रसार आणि प्रभाव अधिक व्यापक झाल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान, विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘प्रयासपत्रक’चे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. हिंदी विभाग आणि आजीवन शिक्षण व विस्तार विभागाच्या वतीने आयोजित निबंध स्पर्धेतील विजेत्या व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. तसेच तासिका तत्त्वावर महाविद्यालयात रुजू झालेल्या प्राध्यापकांचा परिचय करून देत त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सैफ जैदी यांनी केले. प्रास्ताविक डॉ. सय्यद इक्बाल मजाज यांनी केले, तर आभार प्रा. अजमत शेख यांनी मानले. यशस्वितेसाठी प्रा. सुनील जाधव, डॉ. आसाराम पवार, डॉ. मोहम्मद मुजाहेद उर रहमान आणि प्रा. शफी मौलाना यांनी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT