छत्रपती संभाजीनगर

डिग्रसफाटा अपघात प्रकरणी ग्रामस्थांचे धरणे आंदोलन

CD
ABD26J83032 हिंगोली : घटनेची सखोल चौकशी करून दोषींविरुद्ध कारवाई करावी, या मागणीसाठी पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर धरणे आंदोलन करताना ग्रामस्थ. -------------- डिग्रस फाटा अपघाताची चौकशी करण्यासाठी ग्रामस्थांचे धरणे - हिंगोली, ता. १२ : तालुक्यातील डिग्रस फाटा येथे झालेल्या अपघाताची निष्पक्ष चौकशी करावी, चौकशी पूर्ण होईपर्यंत पोलिस निरीक्षकांना निलंबित करावे, या प्रमुख मागण्यांसाठी बुधवारी (ता. ११) डिग्रस (कऱ्हाळे) येथील ग्रामस्थांनी पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. या आंदोलनानंतर ग्रामस्थांनी पोलिस अधीक्षकांना निवेदन दिले. ८ नोव्हेंबर रोजी हिंगोली ते औंढा नागनाथ मार्गावरील डिग्रस फाटा येथे टिप्परने दिलेल्या धडकेत दोन युवकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेने ग्रामस्थांनी संतप्त भावना व्यक्त केल्या असून, या प्रकरणातील गुन्ह्याचा तपास स्वतंत्र व वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे सोपवावा, पोलिस उपनिरीक्षक घुले यांची अपघातानंतर टिप्परमधील उपस्थिती व त्यांची भूमिका याची सखोल चौकशी करावी, हिंगोली ग्रामीण व औंढा नागनाथ पोलिस ठाण्यातील संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करावी, टिप्पर चालक व टिप्परला पोलिस संरक्षणात पोलिस ठाण्यामध्ये नेण्यामागील कारणे व आदेश तपासावेत, संबंधित अधिकाऱ्यांचे सीडीआर, उपलब्ध टॉवर लोकेशन, सीसीटीव्ही, व्हिडिओ व इतर इलेक्ट्रॉनिक पुरावे कायदेशीर प्रक्रियेनुसार जतन करून तपासावेत, दोन व्यक्तींच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर बीएनएस कलम १०५ लागू होण्याबाबत व इतर योग्य कलमांबाबत पुराव्यांच्या आधारे कायदेशीर निर्णय घ्यावा, आदी मागण्या ग्रामस्थांनी केल्या आहेत. या सर्व प्रकरणांची आठ दिवसांत चौकशी करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी डिग्रससह (कऱ्हाळे) परिसरातील ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dwayne Johnson Health : 'द रॉक'ला गंभीर आजार झाल्याची चर्चा? २२ किलो वजन घटल्यानंतर व्हायरल दाव्यामागचे खरे सत्य समोर!

Social Media: एका ओळीची पोस्ट अन् थेट PM मोदींचा रिप्लाय; हा नेटकरी आहे तरी कोण?

Sinhgad Institute : अखेर ‘सिंहगड संस्थे’च्या सात महाविद्यालयांवर ‘प्रशासक’; सात महाविद्यालयांचे व्यवस्थापन शासनाच्या ताब्यात

ISC & ICSE Exam : ‘आयएससी’ची परीक्षा ९ फेब्रुवारीपासून, तर आयसीएसईची १५ फेब्रुवारीपासून; ‘सीआयएससीई’तर्फे दहावी-बारावीचे वेळापत्रक जाहीर

Latest Marathi News Live Update : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण शक्य नाही; सतेज पाटलांची सडेतोड भूमिका

SCROLL FOR NEXT